ad headr

Powered by Blogger.

सर्व पक्षीय नेते , शेतकऱ्यांचे वडजी सबस्टेशनवर ठिय्या आंदोलनमहावितरणकडून आश्वासनानंतर आंदोलन थांबविण्यात आले..

भडगाव ता.17:( प्रतिनिधी )सुभाष ठाकरे. तालुक्यातील वडजी येथील 33/11 केव्ही सबस्टेशनवरील गावांना शेतीसाठी सलग दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांनी महावितरणकडे निवेदनाव्दारे केली होती. अन्यथा सोमवारी उपकेंद्रावर ठीय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुशंगाने काल सकाळी दहा वाजेपासुन शेतकर्यांनी वडजी सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन करायला सुरवात केली. आंदोलनात सर्व पक्षीय नेते व वडजीसह पाढंरद, पिचर्डे, पळासखेडे, नालबंदि आदि गावांचे शेतकरी सहभागी झाले होते. 
शेतकर्याची आक्रमक भुमिका - 
बिबट्याच्या दहशतीमुळे पिकांना रात्रीचे पाणी देणे धोकादायक बनले आहे. त्यात 7 तास शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात येतो. तो ही सुरळीत नसल्याने शेतकर्यानी महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त केला. यावेळी शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. वीजेच्या समस्येमुळे पिकांचे मोठ्याप्रणात नुकसान होत असल्याची भुमिका मांडून तत्काळ दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात अशी मागणी लावून धरली. 

महावितरण ठेकेदारामुळे हतबल!-
महावितरणचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री आडतेकर यांनी ठिय्या आंदोलनात उपस्थीत शेतकर्यांना सामोरे जातांना सांगीतले की, वडजी 33/11 केव्ही सबस्टेशनला कोठली 132 केव्ही सबस्टेशनवरून स्वतंत्र वीज वाहीणी टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी पोल टाकण्यास अडचण येत असल्याने हा विलंब होत आहे. तर ठेकेदार ही यात दिरंगाई करत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. एकूणच ठेकेदारांमुळे महावितरण हतबल दिसून आली. कोठली ते वडजी वीज वाहीणी टाकण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याचे सहाय्यक अभियंता श्री आडतेकर यांनी सांगीतले. त्यामुळे लवकरात लवकर वडजी सबस्टेशच्या गावांना दिवसा सलग वीज पुरवठा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे सांगीतले. या प्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अनिल पाटील, प्रदिप पाटील, 'उबाठा' शिवशक्ती -भीमशक्ती चे तालुकाप्रमुख राजेंद्र मोरे, वडजीचे उपसरपंच भाऊसाहेब परदेशी, पिचर्डेचे माजी उपसरपंच विनोद बोरसे, प्रदिप पाटील, युवासेनचे तालुकाप्रमुख जगदीश पाटील, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख संजय पाटील, वडजीचे माजी उपसरपंच स्वदेश पाटील, समाधान पाटील, बापुजी पाटील, शेतकरी सेनेचे उप तालुकाप्रमुख संभाजी पाटील, पिचर्डे माजी उपसरपंच सोनू महाजन, राजेंद्र पाटील, सतिश पाटील, पळासखेडेचे सरपंच अमृत पाटील, तंटामुक्त समीतीचे अध्यक्ष विजय पाटील, दिपक पाटील, पपेशराव पाटील, डाॅ.दिपक परदेशी, रावसाहेब पाटील, विलास पाटील, भुषण येवले, पाढंरथ चे सरपंच समाधान पाटील, सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब पाटील, धनराज पाटील, भागवत पाटील, नंदकिशोर पाटील,नालबंदिचे गंगाराम राठोड, भगवान निकम,शुभम परदेशी, रोहीत पाटील , धीरज सोनवणे, कुणाल पाटील, प्रदिप पाटील, गणेश पाटील, जयपाल परदेशी, जितेंद्र पाटील, स्वप्निल पाटील आदि शेकडो शेतकरी उपस्थीत होते. 
आमदारांचा काॅल...अन् अधिकार्यांना धरले धारेवर 
दरम्यान शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांना भ्रमणध्वनीवरून आंदोलनाबाबत माहीती दिली. त्यांनी शेतकर्याच्या भूमिकेला सहमती दर्शवत सहाय्यक कार्यकारी अभियंता श्री आडतेकर यांना सलग दिवसा वीजपुरवठा का सुरू होत नाही? असा सवाल करत चांगलेच धारेवर धरले. याप्रसंगी शेतकर्यांनी पुर्वी आठ तास मिळणारी वीज तासावर आणल्याचे सांगीतले. त्यावर पूर्ववत आठ तास वीज देण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले.

No comments