गोदावरी फाउंडेशन, प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग २०२६ चा थाटात प्रारंभ !
जळगाव - दि. 14 [ प्रतिनिधी ] गोदावरी फाउंडेशन संचलित प्रेसिडेन्शियल प्रीमियर लीग चे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रमुख अतिथी मा.अनिल दादा पाटील तथा के जी सोमय्या कॉलेज मुंबईचे डॉ. शरद कोलते, डॉ. वैभव पाटील, डॉ. प्रशांत वारके, डॉ. विजय पाटील, नीलिमा चौधरी, डॉ. नीलिमा वारके यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. उल्हास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, हे क्रिकेट सामने १३ व १४ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहेत, यामध्ये एकूण सात संघांनी सहभाग घेतला. यामध्ये डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सावदा, गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल जळगाव,
गोदावरी अॅग्री कॉलेज, गोदावरी लॉ कॉलेज, डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, डॉ. वर्षा पाटील बीसीए या संघांचा समावेश आहे. स्पर्धेमध्ये गोदावरी फाउंडेशनच्या कर्मचारी वर्गाने उस्फूर्त असा सहभाग घेतला , पहिल्या दिवशी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज संघाने चांगली कामगिरी करत आपण स्पर्धेचे विजेतेपदावर दावा दाखल केला. स्पर्धेचे आयोजन गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएससी स्कूल जळगाव आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव यांनी केले.
Post a Comment