ad headr

Powered by Blogger.

जळगाव महानगरपालिकेत भाजप महायुतीला प्रचंड विजय. भाजप कार्यालयात जल्लोष.

.      जळगाव दि. 16 [ प्रतिनिधी ]
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 29 महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये जळगाव शहर महानगरपालिकेचा निकाल सुद्धा जाहीर झाला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप महायुतीला प्रचंड म्हणजे 99% यश मिळाले असून या विजयाचा जल्लोष आज भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक प्रमुख व शहराचे आ सुरेश भोळे राजू मामा ना शुभेच्छा व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी निवडून आलेल्या उमेदवारांनी जल्लोष व आनंद साजरा केला.या प्रसंगी आमदार राजू मामांनी सुद्धा कार्यकर्त्यांच्या समवेत ढोल ताशाच्या गजरावर ठेका दिला..
फटाके फोडून जल्लोष केला. या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी , महिला मोर्चा,व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतें.

No comments