ad headr

Powered by Blogger.

दीपक जगन्नाथ पाटील वाघोदेकर हे जानवे मंगरुळ जिल्हा परिषद गट लढविणार...!प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकणार...!

अमळनेर [ प्रतिनिधी ] वाघोदे येथील सामाजिक कार्यकर्ता दीपक जगन्नाथ पाटील यांना उमेदवारीसाठी जानवे मंगरूळ गटातील नागरिकांनी गड घातला असून आपण उमेदवारीसाठी तयार व्हा आम्ही तुम्हाला उत्स्फूर्त मतदान करू असे कोपरा बैठका अर्थात कॉर्नर मीटिंग घेऊन नागरिक पाठिंबा दर्शवत आहेत. दीपक पाटील म्हणजे तरुण नेतृत्व, नाथपंथीय जगन्नाथ पाटील यांचे एकुलते एक सुपुत्र आहेत. जुने जाणते नेते धनगर अर्जुन पाटील वाघोदेकर हे 
 गुलाबराव वामनराव पाटील आणि अमृत आप्पा पाटील माजी आमदारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ख्याती होती. कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक, पंचायत समिती, फ्रुट सेल सोसायटी, शेतकी संघ याच्यावर अनेक वर्ष अधिराज्य करणारे व संचालक म्हणून निवडून आलेले अनेक पद भूषविलेले आप्पासाहेब धनगर पाटील यांचा राजकीय वारसा चालवण्यासाठी त्याच तोडीचे त्यांचे राजकीय वारसदार, नातू, सामाजिक कार्यकर्ता दीपक जगन्नाथ पाटील यांची गटामध्ये लोकप्रियता वाढली आहे. 
त्यामुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकताना दिसत आहे. युवा नेतृत्व दीपक पाटील आमच्या जिल्हा परिषद गटातील जि प सदस्य झाले तर आमचा जिल्हा परिषद गट सुजलाम सुफलाम आणि विकासाच्या दृष्टिकोनातून
 सर्व विकासकामांनी भरपूर असा होणार आहे, असे मतदारांचे मत आहे. त्या अनुषंगाने मंगरूळ जानवे गटातील जागृत, जाणते, दूरदृष्टी असलेले, सालस, संयमी समाजसेवक दीपक पाटील यांचा निवडणुकीपूर्वीच नागरिकांच्या गाठीभेटीदरम्यान विजय निश्चित मानला जात आहे.

No comments