ad headr

Powered by Blogger.

🔴पाणीपुरवठा समिती सभापती कैलास नामदेव पाटील यांची दमछाक होणार?? 🔴शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात सभापतींची कसोटी लागणार??

अमळनेर दि. 22. [ प्रतिनिधी ]   संपूर्ण शहरामध्ये शहरातील पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन, नागरिकांच्या समस्या, ठिकठिकाणी पिण्याच्या पाईप लाईनला लागलेली गळती, चेंबरच्या तुटलेल्या जाळ्या त्यांचे मेंटेनन्स, जल कुंभांची स्वच्छता, अप्रशिक्षित वाल्मन, मगरूर अधिकारी, गट नंबर १३९९/१ब मधील नादुरुस्त झालेली तीनशे एम .एम. आय. डी. पाईपलाईन त्या पाईपलाईनच्या शेजारून गेलेली मलमूत्र विसर्जनाची गटार हे सर्व प्रश्न प्रलंबित असून त्यांच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आवाहन पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेव पाटील यांच्यावर येऊन ठेपलेली आहे.
 हे सर्व करताना त्यांची तारेवरची कसरत होते की त्यांच्या बुद्धी कौशल्याने शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होतो याची वाट अंमळनेरची जनता पहात आहे. तूर्तास एवढेच पण पाणीपुरवठ्याची यंत्रणा आव्हानांसह सुरळीत व्हावी हीच अमळनेर करांची अपेक्षा. कारण अनेक वर्षापासून जलकुंभांची स्वच्छता नाही. ही बाब अधोरेखित करावी असे वाटते.

🛑🛑नगर परिषदेत प्रतिगामी आणि पुरोगामी मध्ये कलगीतुरा रंगणार की सेटलमेंट (रस मिसळ) होणार? अमळनेर करांची उत्सुकता शिगेला... पुढील बातमी वाचा.. लवकरच प्रकाशित होणार.



No comments