ad headr

Powered by Blogger.

🔴पिण्याच्या जलवाहिनीने गटारीचा प्रवाह अडविला..🔴घाण काम कर्मचारी तथा न.पा. आरोग्य यंत्रणा नावाला...

अंमळनेर दि.30 [ प्रतिनिधी ] प्रभाग क्रमांक एक गणेश कॉलनी परिसरामध्ये पिण्याची पाईपलाईन गटारी मधून गेलेली असल्याने गटारीचे घाण पाणी त्या पाईपामुळे थांबून जाते. तेथे काही घनकचरा अडकल्यास अनेक दिवस ते पाणी साचलेले असते. 
विशेष म्हणजे तो पाईप बरोबर गटारीतच जोडलेला असल्यामुळे ते घाण पाणी पाईप मध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कोणीही त्याचा कायमस्वरूपी निपटारा करत नाही.
 शेकडो लोकांचा पिण्याचे पाणी या जलवाहिनीतून प्रवाहित होत असते. तो पाईप गटारीतून गेल्यामुळे आरोग्याशी संबंधित तक्रारी उद्भवत असतात. नवीन नगरपालिका प्रशासन आरोग्य यंत्रणा आणि पाणीपुरवठा स्वच्छता सभापती त्याच प्रभागा चे असून त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे असे नागरिकांचे मत आहे.

No comments