मराठी भाषा पंधरवडा निमित्त भडगाव न्यायालयात मराठी भाषा दिन साजरा..
भडगाव दि. 23 [ प्रतिनिधी ] सुभाष ठाकरे
मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त भडगाव वकील संघ व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भडगाव न्यायालय परिसरात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगाव न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश मा. पी. व्ही. राजाळे मॅडम विराजमान होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मा. न्यायाधीश राजाळे मॅडम यांनी मराठी भाषेचे न्यायव्यवस्थेतील महत्त्व अधोरेखित करत, “मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून ती संस्कृती, न्याय आणि लोकशाहीची ओळख आहे. व्यवहार, न्यायालयीन कामकाज व दैनंदिन जीवनात मराठीचा अभिमानाने वापर झाला पाहिजे,”असे मनोगत व्यक्त केले..
या वेळी कार्यक्रमास लाभलेले प्रमुख वक्ते शिक्षक देशमुख सर यांनी मराठी भाषेचा इतिहास, समृद्ध परंपरा व बदलत्या काळात मराठी भाषेचे स्थान याविषयी सखोल माहिती दिली. तसेच अॅड. महेंद्र पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास भडगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. बी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संघाचे सचिव प्रकाश सोनवणे, अॅड. अशोक बाग, अॅड. मुकुंद पाटील, अॅड. आर. के. वाणी, अॅड. रणजित पाटील, अॅड. रोहित मिशर, अॅड. आसिफ शेख, अॅड. भरत ठाकरे, अॅड. प्रकाश तिवारी, समाधान सोनवणे, अॅड. कुणाल मोरे, सरकारी वकील जगपती मॅडम, अॅड. विजय महाजन, अॅड. उमेश महाजन यांच्यासह अनेक वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच न्यायालयीन कामकाजासाठी आलेली पक्षकार मंडळीही कार्यक्रमास उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजत दायमा यांनी प्रभावीपणे केले. तर कार्यक्रमाच्या शेवटी bरानडे भाऊसाहेब यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी हेमंत कुलकर्णी,वसंत चव्हाण, तसेच न्यायालयीन कर्मचारी अधीक्षक बारी नाना, माळी नाना, शिपाई वाडिले आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी भाषेचा गौरव, तिच्या संवर्धनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर सकारात्मक ठसा उमटवून गेला.
Post a Comment