ad headr

Powered by Blogger.

लाडकूबाई विद्या मंदिर भडगाव येथे "साधनाई" वार्षिक स्नेहसंमेलन- २०२६ उत्साहात संपन्न...

भडगाव दि. 20 प्रतिनिधी सुभाष ठाकरे. मंगळवार रोजी कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था, भडगाव संचलित लाडकूबाई विद्या मंदिर व दादासाहेब सु.मा. पाटील कनिष्ठ महाविद्यालय भडगाव येथे "साधनाई वार्षिक स्नेहसंमेलन २०२६" उत्साहात संपन्न झाला.
                 या स्नेहसंमेलनाचे उदघाटन तथा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव हरी पाटील यांच्या शुभहस्ते प्रतिमांचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी भडगाव नगरीचे नवनियुक्त नगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मालचे, नगरसेविका श्रीमती किरण अतुल पाटील , अपक्ष नगरसेवक आदरणीय अलीम शाह, स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन आदरणीय आप्पासाहेब श्री सुभाष सुपडू पाटील, स्कूल कमिटी सदस्य आदरणीय श्री एस ए जाधव सर , आदरणीय दादासाहेब युनूस बागवान , कृषी सहाय्यक
 आदरणीय श्री सचिन सोमवंशी साहेब, विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशाली ताई पाटील मॅडम उपप्राचार्य श्री एस जे पाटील सर, पर्यवेक्षक श्री एस बी भोसले सर उपस्थित होते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब आणि उपस्थित प्रमुख पाहुणे यांचे स्वागत विद्यालयामार्फत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशालीताई पाटील मॅडम यांनी आपल्या प्रस्तावनेत स्नेहल संमेलनाचे महत्त्व आणि साजरा करण्याचं उद्दिष्ट समजावून सांगितले.
              या स्नेहसंमेलनाची सुरुवात इयत्ता नववी क च्या विद्यार्थिनींचा गणेश वंदना या गीताने करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील दुर्गा देवीचा गोंधळ, कोळी गीत, श्यामची आई नाटिका, विद्यालयाच्या उपशिक्षिका देवकर मॅडम यांनी श्यामची आई यांचे महत्त्व पटवून आई माझी मायेचा सागर हे गीत म्हटले,पुष्पा पुष्पा गीत,घुमर घुमर राजस्थानी गीत, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित नाटिका, झटपट पटापट विनोदी गीत, असे अनेकविध मनोरंजनात्मक बहारदार चित्रपटांच्या गीतांवर डान्स या कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आले आणि तसेच शेवटच्या टप्प्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित छावा या नाटिकेने स्नेहसंमेलनाची सांगता करण्यात आली.
                  अशा या दैदीप्यमान कार्यक्रम विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती वैशालीताई पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आलेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपशिक्षक श्री दीपक भोसले सर आणि श्री जी एन पाटील सर यांनी केले. या स्नेहसंमेलनासाठी विद्यालयातील विद्यार्थी आणि माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमासाठी सहशालेय समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले. 
       यावेळी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

No comments