ad headr

Powered by Blogger.

बंडखोरांना मतदार कौल देणार नाहीत,” घराणेशाहीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे जळगावातून ठाम वक्तव्य...

जळगाव. [  प्रतिनिधी ]..निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंडखोरी आणि घराणेशाहीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावातून स्पष्ट उत्तर दिले. “पक्षाशी बंडखोरी करणाऱ्यांना जनता कधीच स्वीकारत नाही. लोकशाहीत अंतिम निर्णय जनतेचा असतो आणि बंडखोरांना मतदार कौल देणार नाहीत,” असे परखड मत त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले
महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील तिकीट वाटपावरून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भाजपचे धोरण सुरुवातीपासून स्पष्ट आहे. “आमदारांच्या परिवारातील व्यक्तींना उमेदवारी देऊ नये, हे धोरण ठरवूनच राबवले गेले. मात्र काही ठिकाणी ऐनवेळी निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी, उमेदवारांची कमतरता आणि पर्यायी पर्याय नसल्याने नाईलाजास्तव काही निर्णय घ्यावे लागले,” असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले.

 घराणेशाही विरोधात भाजपा ठाम
घराणे शाहीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, भाजपने शक्य तितक्या ठिकाणी नव्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. “कुठेही घराणे शाहीला प्रोत्साहन देण्याचा हेतू नाही. मात्र राजकारणात कधी-कधी परिस्थितीजन्य तडजोड करावी लागते,” असे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
.     महायुतीच्या एकजुटीवर विश्वास
 फडणवीस यांनी महायुतीतील एकजुटीचा पुनरुच्चार करत विजयाचा विश्वास व्यक्त केला. “बंडखोरांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, हे निश्चित आहे. विकासकामे, पारदर्शक प्रशासन आणि लोकहिताच्या निर्णयांच्या जोरावर महायुतीचे उमेदवार मोठ्या बहुमताने विजयी होतील,” असे त्यांनी सांगितले. तसेच मतदारांनी विकासासाठी महायुतीला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.


No comments