ad headr

Powered by Blogger.

🔴पत्रकारितेतील भाऊ गर्दी धोक्याची घंटा ???🔴माध्यमे दावणीला बांधली गेलीत का???🔴लोकशाहीचा चौथा स्तंभ दशा आणि दिशा..?🔴संबंधितांनी आत्मपरीक्षण ,चिंतन ,मनन करणे आवश्यक वाटते का? *पत्रकार दिनानिमित्त लेखन प्रपंच,.

अमळनेर दि. 6 प्रतिनिधी.. न्यायपालिका, कार्यपालिका, संसद ,आणि प्रचार प्रसार माध्यमे ही लोकशाहीची चार स्तंभ आहेत हे सर्वश्रुत आहे. परंतु हे सर्व भाषणांमध्ये शोभते अशी शोभेची शब्द झाली आहेत. पत्रकारिता म्हणजे समाज मनाचा आरसा, दांभिकांवर प्रहार, अन्यायग्रस्तांसाठी बुलंद आवाज, सर्व समावेशक, धर्मनिरपेक्ष ,सहिष्णू, लोकशाहीचा आदर करणारा प्रसंगी कडवट राष्ट्रवादी. अशी अनेक बिरुदावली पत्रकाराला दिली गेलेली आहेत. अनेक महानुभाव पत्रकारांनी त्यांच्या लेखणीतून आजूबाजूतील घडामोडी अत्यंत स्वच्छ, पारदर्शकपणे मांडल्यामुळे अनेक वेळा घटना जशीच्या तशी समोर उभी राहते. एखाद्या घटनेच्या तळाशी जाऊन घटनेतील सत्यता शोधून काढून ती समोर मांडणे अर्थात "शोध पत्रकारिता" सर्वोत्कृष्ट मानली गेली आहे.,
 स्तंभलेख ,अग्रलेख यामुळे काहींनी पत्रकारिता जोपासली आहे.आपण कोणत्या पत्रकारितेत मोडतो याचे आत्मचिंतन थोडे थोडक्या पत्रकारांनी करावे हेच फक्त पत्रकार दिनानिमित्त आपणा काही बांधवांना प्रेमाचा सल्ला. तसेच पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा. माध्यमांमध्ये काम करणारे आपण आहोत म्हणून लोकशाही शाबूत आहे हा जनतेचा विश्वास आहे ,त्याचा भ्रमनिरास न व्हावा हीच जनतेची अपेक्षा....

No comments