संगमनेर येथील रामचंद्र शंकराव कपिले राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवक पुरस्काराने सन्मानित..
संगमनेर [ प्रतिनिधी ]. बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित लोणी येथे भव्य सन्मान सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाभावी समाज बांधवांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केला. होता महाराष्ट्र राज्यातून सेवाभावी समाज बांधव सुवर्णभरारीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुवर्णभरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात अन्याय अत्याचार व न्यायासाठी कार्य करीतआहे.
या संस्थेच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी कार्य आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे या संस्थेच्या माध्यमातून विविध सेवाभावी समाज बांधवांनी केलेल्या कार्याची पावती मिळावी व त्यांना पुन्हा नवीन कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त व्हावी.यासाठी दरवर्षी सन्मान सोहळ्याचे आयोजन केले जाते 2025 चा सन्मान सोहळा व पुरस्कार वितरण सोहळा लोणी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला होता त्यात श्री रामचंद्र शंकरराव कपिले यांचा जन्म 1950 साली सामान्य परिवारात शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे शंकरराव कपिले व पार्वताबाई यांचे घरी झाला ते आई वडिलांचे एकूण ते एक असून बालपणापासून अत्यंत हुशार व तल्लख बुद्धीचे असल्याने त्यांचे शिक्षण सिविल डिप्लोमा पर्यंत झाले.त्यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते संगमनेर येथे सेवा देत सेवानिवृत्त झाले. त्यांच्या उषाताई या जीवन संगिनी व त्यांना दोन मुले व दोन मुली असून ते सुद्धा उच्चशिक्षित आहेत.त्यांनी सोनार समाजाच्या अनेक संघटनांमध्ये लेखनीय कार्य केले आहे. आजही ते राष्ट्रीय स्तरावर अनेक सोनार समाजाच्या संघटनेवर कार्य करीत असून ते सामाजिक कार्यानिमित्त भारतभर प्रवास करीत असतात. त्यांनी आजपर्यंत अनेक संघटनांमध्ये कार्य केले व विविध पुरस्कारांनी सन्मानित देखील झालेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेत सतत इतरांची सेवा करणे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणे ही त्यांची सेवावृत्ती बघून सुवर्णभरारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे संस्थेच्या संस्थापिका डॉक्टर सारिका ताई नागरे धर्माचारी श्री 1008 श्री दत्त पिठाचे पिठातील श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ व अनेक प्रतिष्ठित समाज बांधवांच्या हस्ते राज्यस्तरीय उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी हा सन्मान त्यांना घडविणारे त्यांची आई वडील यांना समर्पित करून त्यांच्या हातून घडणाऱ्या सामाजिक कार्याची अनमोल भेट असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले. हा सन्मान त्यांना देऊन सन्मानित केल्याबद्दल सुवर्ण भरारीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. श्री रामचंद्र शंकराव कपिले यांना हा सन्मान प्राप्त झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख सुनील सोनार व रवी माळवे यांनी प्रसिद्धी पत्रकार दिली
Post a Comment