शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा शरद शिंदेचा बोलवता धनी कोण?? बोगस शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला जबाबदार असलेला शरद शिंदे अद्याप मोकाट का? शरद शिंदेला मुद्दाम अभय तर नाही ना??जाणकारांचा संतप्त सवाल...
अमळनेर (प्रतिनिधी) बोगस शालार्थ आय.डी.व बेकायदेशीर शिक्षक शिक्षकेतर भरती प्रकरणी फरार असलेला शरद शिंदे व त्याला मदत करणारे यांना अद्याप अटक का नाही?. नक्की पाणी मुरते कुठे आहे? एवढा मोठा गुन्हा अर्थात 409, 420 व अत्यंत गंभीर गुन्हे दाखल असलेला शरद शिंदे याच्या भ्रष्टाचाराचे दाखले द्यावे तेवढे थोडेच आहेत. त्यांनी विकत घेतलेल्या संस्था आणि संस्थेंवरची सुरू असलेली चौकशी त्यामुळे निरपराध कर्मचाऱ्यांवर पगार बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. गेल्या दहा-अकरा महिन्यापासून शिवाजी हायस्कूल तांबेपुरा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन बंद असून. तेथील विद्यार्थी संख्या 25 टक्क्यावर येऊन ठेपलेली आहे. शाळेला प्रांगण नाही. शाळेच्या परिसरामध्ये अवदाशींन्य आहे काटेरी झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतून काढून घेण्याचा सपाटा चालवला आहे. अत्यंत पवित्र असलेल्या शिक्षण क्षेत्राला शरद शिंदे नावाच्या भ्रष्टाचारी माणसामुळे कलंक लागला आहे. त्याचे धागेदोरे सर्व दूर पसरलेले आहेत.
तपास यंत्रणेच्या हातावर तुरी देऊन तालुक्यांमध्ये फिरणारा शरद शिंदे याचा बोलवता धनी कोण आहे.? याला कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा राजाश्रय आहे? या सर्व गोष्टींचा मनस्ताप आणि बेरोजगारी च्या छायेखाली तेथील कर्मचारी रुंद वावरत आहेत. येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी शिवाजी हायस्कूल तांबेपुरा येथील सर्व कर्मचारी उपोषणाला बसणार आहेत. अशा आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी याच्यावर ब्र काढायला तयार नाही. शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी शिवाजी हायस्कूल तांबेपुरा याच्यावर प्रशासक बसवण्याची आदेश मागच्या वर्षी दिलेले असताना सुद्धा निर्णयाची कुठलीही अंमलबजावणी नाही. यामुळे सर्व शिक्षकांनी सार्वजनिक रजा घेऊन जळगाव येथे जिल्हा शिक्षण अधिकारी च्या भेटीला गेले होते ,तरीसुद्धा दहा मिनिटे सुद्धा त्या त्यांच्याशी बोलल्या नाहीत अशी तक्रार कर्मचाऱ्यांची आहे. या सर्व बाबींमुळे जुने कर्मचाऱ्यांना वेठीस का धरण्यात येत आह? असा संतप्त सवाल या निमित्ताने जनमानसात विचारण्यात येत आहे. या सर्व गुन्ह्यात आरोपी असलेला शरद शिंदे आणि त्याचे साथीदार यांना मोकळा ठेवल्यास यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यात ते यशस्वी होतील. की त्याच्याकडे असलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्याला मुद्दाम वेळ देण्यात येत आहे?. अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
Post a Comment