भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी व वीर बाल दिनानिमित्त व्यापार आघाडीतर्फे 100 गरीब गरजू बांधवांना ब्लॅंकेट वाटप.
जळगाव दि.27 [ प्रतिनिधी ]..
देशाचे लोकप्रिय माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी, यांच्या १०१ जयंतीनिमित्त व वीर बाल दिनानिमित्त काल 26 डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजता जळगाव रेल्वे स्थानकावरील 100 गरजू गोरगरीब बांधवांना जळगाव शहराचे आ सुरेश भोळे (राजू मामा) भाजप जिल्हा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, बाजार समिती सदस्य उद्योजक अशोक राठी, यांच्या हस्ते ब्लॅंकेट वाटप करण्यात आले होते सदरील कार्यक्रम भाजप व्यापारा आडीचे अध्यक्ष विनय बाहेती, पदाधिकारी
सुरेंद्र जी अग्रवाल,भूषण देपुरा ,उमेश जैन, मुकेश कुकरेजा ,जितेंद्र चव्हाण, राकेश लड्डा, मनीष ओझा, किर्तन शेजपारा व पदाधिकारी यांनी आयोजित केला होता याप्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयेश भावसार जिल्हा पदाधिकारी मनोज भांडारकर, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, मनोज सोनवणे महेश चौधरी, नीलू आबा, यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment