शाळा दुर्घटना.नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षीय चिमुकल्यांना न्याय मिळण्यासाठी भडगाव शहर स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद.
भडगाव दि.20 [प्रतिनिधी] सुभाष ठाकरे.
दिनांक 16 रोजी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल भडगाव या शाळेला लागून असलेल्या कोल्हा नाल्याच्या पाण्यात पडून नर्सरीत शिकणाऱ्या चार वर्षीय बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी आज संपूर्ण भडगाव शहरातील बस स्टँड परिसर बडेसर कॉम्प्लेक्स, नवकार प्लाझा, चाळीसगाव रस्ता, पाचोरा रस्ता, पेठ भाग येथील व्यापाऱ्यांनी घटनेच्या निषेधार्थ स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के बंद पाळाला.
सदर घटनेतील आठ ते दहा आरोपी अद्याप फरार असून त्यांना तात्काळ अटक करावी व शाळेतील संचालक मंडळ बखास्त करून प्रशासक बसावे अशा अनेक
मागणीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना आज दुपारी समस्त नागरिक व सर्वपक्षीय तर्फे देण्यात येणार आहे.
Post a Comment