अमळनेर नगरपरिषद निवडणूक 2025 ,डॉ. परिक्षीत बाविस्कर यांचा दणदणीत विजय.
अमळनेर दि. 21 [ प्रतिनिधी ]नगरपरिषदेच्या 2025 च्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. परिक्षीत श्रीराम बाविस्कर यांनी तब्बल 30,856 मते मिळवत 8,648 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे अमळनेरच्या राजकारणात नवे समीकरण उदयास आले. अपक्ष व विविध आघाड्यांचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे.नगरपरिषदेच्या 36 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अनेक प्रभागांत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या.
शहर विकास आघाडीने 11 जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा पटकावल्या, तर शिरीष चौधरी गटाने (धनुष्यबाण) 10 जागांवर यश संपादन केले. याशिवाय अपक्ष उमेदवारांनी 12 जागांवर विजय मिळवत निर्णायक भूमिका बजावली आहे.
Post a Comment