नगर परिषदेची नागरी उथान योजना तकलादू.. नागरिकांची हेळसांड.
अमळनेर दि.6 [ प्रतिनिधी ]. नगर परिषदेची 24 तास पिण्याचे पाणी उपलब्ध राहील यासाठी निर्माण करण्यात आलेली नागरी उथान योजना प्रभाग क्रमांक एक आणि दोन अर्थात तांबेपुरा आणि साने नगर येथे सुरू आहे. अंतर्गत रस्ते तयार होण्याला वर्ष उरतला नाही तोवर या योजनेसाठी पाईपलाईन खोदण्यासाठी रस्ते फोडण्यात येत आहेत. ती फोडलेली रस्ते पाईपलाईन झाल्यानंतर रहीवाशी नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे. जेसीबी मुळे पाईपलाईन होताना जुने नळांचे कनेक्शन तुटून तेथे अनेक दिवस नळ जोडले जात नाहीत ते लिकेज असतात त्यामुळे पाईपलाईन मध्ये माती जाऊन ते मातीयुक्त व घाणीयुक्त पाणी रहिवाशांच्या पिण्यामध्ये जात आहे.
त्यामुळे अनेक आरोग्याच्या तक्रारी निर्माण झालेल्या आहेत. या योजनेवर काम करणारे कंत्राटी कामगार यांची सुरक्षा वाऱ्यावर असून सहा इंची पाईप जोडण्यासाठी विद्युत प्रवाहाची उपलब्धता करणे अनिवार्य असते परंतु ते विद्युत उपकरण स्ट्रीट लाईटच्या तारांवर बिनदिक्कत आकडा टाकून लावले जात आहे.
अर्थात त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवत आहे. काम करतेवेळी शॉक लागला तर याला जबाबदार कोण राहील? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.या कामावरील ठेकेदार गजानन पाटील अमरावतीकर यांनी कामगारांना तशी तंबी दिलेली आहे? की नगर परिषदेचे काम आहे? कोणत्याही तारांना लावून आपले विज उपकरण कापून पाईप लाईन जोडणी करावी.
Post a Comment