विजयी जोडी लखिचंद पाटील व धर्मपत्नी समीक्षा पाटील दिग्गजांवर भारी...भडगाव मधील शिवसेनेची भक्कम आघाडी.
भडगाव दि. 25.प्रतिनिधी: सुभाष ठाकरे
नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने दमदार कामगिरी करत कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगावच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या निवडणुकीत स्वर्गवासी बापूजी युवा फाउंडेशन चे संस्थापक युवा नेते लखिचंद पाटील या निवडणुकीत किंग मेकर ठरले असून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला घवघवीत यश मिळाले आहे.
गेल्या काही वर्षापासून सामाजिक राजकीय विकासमात्मक कार्यातून शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या लखिचंद पाटील यांच्या नेतृत्वावर मतदारांनी विश्वास ठेवला आहे. असे निकालातून स्पष्ट झाले आहे. यासोबतच लखिचंद पाटील दापत्यांनीही निवडणूक जिंकत भडगाव तालुक्यातून लक्ष वेधून घेतले आहे. नवरा- बायको दोघी नगरसेवक म्हणून निवडून येण्याची घटना भडगावच्या राजकारणात विशेष चर्चेला विषय ठरली आहे.
लखिचंद पाटील हे प्रभाग क्रमांक ६ मधून एकूण १३९१ मते मिळवत६३४ मतांचा फरकाने दणदणीत विजय नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच त्यांच्या धर्मपत्नी समीक्षा पाटील हे प्रभाग क्रमांक ८मधून अत्यंत चुकीच्या लढतीत समीक्षा पाटील यांनी १३०१ मते मिळवत अवघ्या 1४ मतांच्या फरकांनी विजय मिळवला आहे. त्यांनी दिग्गज नेते प्रताप नाना पाटील यांच्या कन्या पूनम ताई पाटील यांचा पराभव केला. हा निकाल राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, पारंपरिक राजकारणाला मतदारांनी नाकारत नव्या नेतृत्वाला संधी दिल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे. अवघ्या १४ मताच्या फरकांनी विजय मिळालेला हा कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या विजयात सर्वसामान्य नागरिक युवक महिला तसेच कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा लाभल्याचे दिसून आले आहे. यांनी शहरात केलेली विकास कामे, प्रचारातील मुद्दे आणि लाडक्या बहिणीच्या मतदानाचा फायदा शिवसेनेला झाला.
मतमोजणीच्या दरम्यान शेवटच्या फेरीनंतर निकाल स्पष्ट होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शहरात विजयाच्या घोषणा देत शिवसेनेचे झेंडे फडकवण्यात आले. या निकालामुळे भडगावच्या राजकारणात शिवसेनेची पकड अधिक मजबूत झाल्याच्या स्पष्ट झाले आहे. आगामी काळात शहराच्या विकास कामासाठी शिवसेना आघाडी निर्णय भूमिका घेणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. लखिचंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भडगाव शहरात विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
Post a Comment