ad headr

Powered by Blogger.

मनूस्मृती नावाचा ग्रंथ का जाळण्यात आला ?... वाचाल तर वाचाल... बघा डोक्यात येते की डोक्यावरून जाते?..

.             अमळनेर दि. 24 प्रतिनिधी
 मनुस्मृती दहन दिवस म्हणजे समस्त महिलांच्या व बहुजनांच्या मुक्तीचा दिवस..!
भारत हा देश सिंधू संस्कृतीमुळे जगात ओळखला गेला.. भारतात केलेल्या उत्खननाने मूळ संस्कृतीचा शोध लागला.. मातृसत्ताक विचाराची संस्कृती असलेला देश म्हणून ओळख झाली... समताधिष्ठित, मूल्यवर्धित असा सुंदर सुजलाम सुफलाम देश भारत गणला गेला... अशोक सम्राटाने या देशाला फार उंचीवर पोहोचविले.. शेती ,उद्योग व्यापार, कला, विज्ञान, तत्त्वज्ञान या सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केली होती.. बुद्धाचे विवेकी, चिकित्सक, बुद्धनिष्ठ तत्त्वज्ञान अशोक सम्राटाने आपल्या राज्यात रुजवले.. भारतामध्ये नालंदा नावाच्या विद्यापीठात असंख्य पुस्तकांचा भांडार होता... तुर्कांच्या आक्रमणामुळे तो जाळला गेला.. भारतामध्ये त्यानंतर प्रतिक्रांती होऊन वैज्ञानिक विचार नष्ट करण्यात आले.. आज जर हे विचार असते तर भारत अव्वल नंबरचा देश कधीचाच नावारूपाला आला असता परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जागेवर अंधश्रद्धा ने जागा घेतल्याने पाहिजे तसा चिकित्सा दृष्टिकोन भारतामध्ये निर्माण झाला नाही.. बुवा, बाबा, भोंदू यांच्या सांगण्यावर लोकांचा विश्वास असल्याने विवेकी विचार फोफावला नाही.. आजही विज्ञानाच्या संशोधनात भारत देश मागे आहे.. 
भौतिकशास्त्रात संशोधन अगदी नगण्य आहे.. भारत देशात विवेकी विचार, चिकित्सक दृष्टिकोन देणाऱ्या विचारवंतावर हल्ले करून त्यांना संपविण्यात आले.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धांचा बुद्धिनिष्ठ विचार घेऊन भारतामध्ये वैचारिक क्रांती केली. या मानवाने दिलेल्या अप्रतिम संविधानामुळे भारताला जगामध्ये वेगळी ओळख निर्माण झाली. धर्मनिरपेक्ष संविधान जगातले मानवतावादी एकमेव सर्वात मोठे संविधान आहे.. बाबासाहेबांनी कुण्या एका जातीला महत्त्व दिले नाही... सर्व जातींच्या, धर्माच्या लोकांना मानवतेवर उभे केले. . भारतामध्ये न्याय, समता, बंधुता, समानता, सर्व प्रकारचे विचार स्वातंत्र्य देऊन प्रगल्भ माणूस घडवण्यासाठी संविधानात संधी उपलब्ध करून दिली... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामान्य व्यक्ती ते श्रीमंत व्यक्ती यामध्ये कोणताच फरक ठेवला नाही.. बाबासाहेबांच्या काळामध्ये विषमता पराकोटीला पोहोचलेली होती.. बाबासाहेबांना विषमतावादी व्यवस्थेचे प्रत्यक्ष चटके बसले होते.. माणसात जन्मजात काहीही फरक नसताना त्यात भेद का मानला जातो याचा विचार केला.. भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास करीत असताना मनुस्मृति नावाच्या विषमतावादी ग्रंथामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था दिलेली होती.. मनुवादी याच विचाराने समाजामध्ये जाती जातीत भेद करून जगत होते.. कनिष्ठ जातीत कितीही हुशार व्यक्ती असला तरी त्याला उच्च जाती चे लोक महत्व देत नव्हते.. सर्वात श्रेष्ठ जात ब्राह्मण मानली गेली होती.. कारण ग्रंथ लिहिण्याचा अधिकार ब्राह्मणांकडे होता.. मनुस्मृतीनुसार ब्राह्मणांचा जन्म ब्रह्माच्या मुखातून झाल्याचे वर्णन केलेले होते. प्रत्यक्ष विवेक विचार करायला संधी नव्हती.. त्यांनी लिहिलेल्या गोष्टी इतर वर्णाच्या लोकांनी खऱ्या मानाव्या असा दंडक होता.. ग्रंथात खोटे लिहिलेले असल्यास त्यावर कोणालाही भाष्य करता येत नव्हते.. बहुजन समाजाला कोणत्याच प्रकारचा अधिकार दिलेला नव्हता... बहुजनांचा वर्ग शूद्र गणला गेलेला होता.. महाराष्ट्रातील छत्रपती राजे शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करताना ते शूद्र असल्याने पुरोहित करीत नव्हते.. छत्रपती शिवाजीराजे यांच्या वंशज छत्रपती शाहू यांना वेदोक्त प्रकरणांमध्ये ते शूद्र असल्याने त्यांना वेगळे मंत्र म्हटले जात होते.. राजे लोकांना इतका त्रास होता तर सामान्य लोकांना जगणे कठीण होते.. सर्वच समाजातील स्त्रियांना तुच्छ लेखले गेले होते.. ब्राह्मणांच्या महिलांना त्यांचे पती गेल्यावर सती जावे लागत होते. हाच नियम सर्व समाजातील स्त्रियांना होता. ज्या महिला विधवा झाल्या त्यांना भगवे अथवा पांढरे वस्त्र घालून घरामध्ये राहावे लागेल.. त्या महिलांना पूजा विधी मध्ये स्थान दिले जात नव्हते.. अशा महिलांवर जगातील लोक व बाहेरील लोक अत्याचार करीत.. महात्मा फुले यांनी काशीबाई नावाच्या महिलेवर झालेल्या अन्यायामुळे ती आत्महत्या करण्यास जात होती... तिला महात्मा फुलेंनी वाचवून तिच्या पोटात असलेल्या बाळाला दत्तक घेऊन सन्मान केला.. त्यावेळी कोणताही समाज सुधारक अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकला नाही.. ते काम पुरोगामी विचार असलेल्या महात्मा फुलेंनी केले.. महात्मा फुलेंनी भारतीय ग्रंथांचा अभ्यास केला.. त्यात त्यांना बहुजनांवर अन्याय करत आलेले असल्याचे निदर्शनास आले... महात्मा फुलेंनी बुद्धानंतर मनुस्मृती ग्रंथ नाकारला.. तोच ग्रंथ बाबासाहेबांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे जाळला... हा मनुस्मृती ग्रंथ गंगाधर निळकंठ सहस्रबुद्धे या विचारी व्यक्तीच्या हातून जाळला... बाबासाहेबांच्या सोबत अनेक त्यांचे ब्राह्मण मित्र होते.. त्यांनाही या ग्रंथाबद्दल आक्रोश होता... अस्पृश्य जाती बद्दल अन्यायकारी कायदे मनुस्मृतीमध्ये होते.. ग्रंथ वाचणाऱ्या लोकांची जिव्हा छाटली जायची... ग्रंथ ऐकणाऱ्या लोकांच्या कानात शिसे ओतले जायचे इतकी मोठी शिक्षा कोणत्या कायद्यात नाही.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवतावादी होते. त्यांनी जगाच्या सर्व संस्कृतीचा अभ्यास केलेला होता.. मनुस्मृतीही तीन वेळा सखोल वाचली होती.. मनू स्मृतीचे कायदे भारताला मूल्य देणारे नव्हते.. मनुस्मृतीचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांवर होणाऱ्या सर्व अन्यायावर पर्याय म्हणून हिंदू कोड बिल याची रचना केली.. त्यामुळे स्त्रियांना स्वातंत्र्य, समता, न्याय मिळाला.. मनुस्मृती चे कायदे असते तर कोणतीच स्त्री शिकू शकली नसती .. बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये स्त्री ला मतदानापासून ते स्वाभिमानाने जगण्याचा , स्वतःच्या पायावर उभ राहण्याचे धाडस दिले... स्त्रिया मात्र बाबासाहेबांचे ऋण विसरून गेल्या. . अजूनही सर्वात जास्त अंधश्रद्धा स्त्रियांच्या पुढाकाराने चालत आहे.. स्वाभिमानाने उभ्या राहिलेल्या स्त्रिया कधी अंधश्रद्धा विरुद्ध आवाज उठवतील हे काळ वाट पाहत आहे... वैचारिक प्रबोधन झाल्यास भारताच्या प्रत्येक नागरिकास खरे स्वातंत्र्य प्राप्त होईल... मनुस्मृतीचे कायदे सुप्त पद्धतीने बुवा महाराज ,पुरोहित, ज्योतिषी यांच्यामार्फत चालूच आहे.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देवाच्या जागेवर मानवाला प्राधान्य दिले.. मानवाचा विकास आज खरा देशाचा विकास आहे.. बहुजनांना आता असलेल्या नोकरीच्या संधी भविष्यात राहतील याची शाश्वती नाही... समान शिक्षण अद्यापही आपली व्यवस्था बालकास देऊ शकले नाही.. भांडवलदारांच्या ताब्यात सर्व व्यवस्था देऊन उत्तम शिक्षण देण्याची वाट पाहत आहे... ज्याला पैसे कमवायचे आहे आपल्याला उत्तम शिक्षण देऊ शकणार नाही. . शिक्षण सम्राट पैसे कमवण्यासाठी दुकाने उघडून बसलेली आहेत.. भविष्यात सामान्य नागरिक शिक्षण घेऊ शकणार नाही.. ओघाने मनुस्मृति चे राज्य यायला वेळ लागणार नाही.. बाबासाहेबांनी खूप मोठा दुरचा विचार करून मानवता गाडून टाकणारा अन्यायकारी ग्रंथ जाळून त्याचा निषेध केला.. ज्या माणसाला पुस्तक बद्दल अतोनात प्रेम होते . . ज्या व्यक्तीने पुस्तकाच्या वाचनासाठी राजगृह संपूर्ण पुस्तकाने भरून ठेवले होते.. पुस्तक ज्याचा प्राण होता.. अशा महान विचारवंताने मनुस्मृति सारखा ग्रंथ जाळला कारण माणसा माणसात भेद करणारा हा ग्रंथ होता.. डॉक्टर बाबासाहेबांचा संस्कृत भाषेचा अभ्यास होता.. जगाचा अभ्यास असलेल्या विद्वानाने हा ग्रंथ जाळला होता... मनुस्मृतीची ही प्रतिकात्मक होळी होती... या ग्रंथाच्या जाळल्याने खरी स्त्री मुक्ती होती.. अनेक पुरोगामी ब्राह्मणांनी ब्राह्मण्य सोडून बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण केले.. आज सर्वात जास्त ब्राह्मण जातीतील महिला शिकून पुढे आलेले आहेत.. बाबासाहेबांची क्रांती सर्व महिलांसाठी, वंचित घटकांसाठी, गरीब, कष्टकरी बहुजन लोकांसाठी होती.. तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, कर्मवीर भाऊराव, गाडगेबाबा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे समाज प्रगत झाला.. मनुस्मृति पुन्हा पुन्हा समाजामध्ये भक्कम करण्याचा प्रयत्न चालू आहे.. सर्व महिलांनी चिकित्सक विचार करून गौतम बुद्ध, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर आधारित जीवन जगले पाहिजे.. अंधश्रद्धांना खातपाणी घालून आयुष्य पुन्हा गुलामगिरी वाया घालता कामा नये... मनुस्मृतीच्या विचाराने पोखरण चाललेला समाज बनवण्याची हिम्मत ठेवली पाहिजे.. महाडला मनुस्मृती जाळून डॉक्टर आंबेडकरांनी अन्याय मुक्त समाज निर्माण करण्याची शपथ घेतली... डॉक्टर बाबासाहेब यांना घरी पाणी मिळत होते.. परंतु हा देश सर्वांचा आहे येथे कुणीही लहान थोर नाही.. नैसर्गिक संपत्तीचा अधिकार प्रत्येकाला आहे.. देशात समता निर्माण करण्यासाठी केलेला हा मोठा प्रयास होता.. आपले जीवन सुखाच्या खाईत टाकून या महापुरुषाने स्वतःच्या संसाराची तमा केली नाही.. अशा महापुरुषाने आम्हाला मुक्तपणे जगण्याचे स्वातंत्र्य बहाल केले.. अशा या थोर महापुरुषास अभिवादन करून विषारी मनुस्मृतीला पुन्हा उगवू देणार नाही याची शपथ घेऊ या...!

No comments