विप्रो कंपनीतिल मानव संसाधन यांचा मनमानी कारभार..स्थानिक कर्मचाऱ्यांना तसेच कंत्राटी कामगारांना केले बेरोजगार..
अमळनेर ( प्रतिनिधी) विप्रो कंपनीची मातृसंस्था अमळनेर मध्ये अनेक दशकांपासून कार्यरत आहे. हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे कर्मचारी सदन झालेत. परिणामी अन्न, वस्त्र, निवारा ,शिक्षण ,आरोग्य या मूलभूत गरजांसाठी मुख्य प्रवाहात आले. जीवनमान उंचावले. मागील दोन वर्षापासून नवीन प्लांट उभारला जात आहे. त्या प्लांट साठी लागणारे विकास कामे सुरू आहेत. सर्व आलबेल चालू असताना कर्मचाऱ्यांच्या भरत्या व भरती प्रक्रिया सुद्धा सुरू आहे.
त्याचबरोबर कंत्राटी कामगारांना सुद्धा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. परंतु नवीन कंपनीतील मानव संसाधन अर्थात एच. आर. (Human resources )यांनी हेतू पुरस्कर काही कंत्राटी कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यांच्यावर खोटे आरोप करून, त्यांना नोकरीवरून निष्काषित करून बडतर्फ करण्यात आलेले आहे. कामगारांच्या उपासमारीला कारणीभूत नवीन एच, आर ,ठरत आहेत. जे कर्मचारी सेवा देऊन निवृत्त झाले त्यांच्या पाल्यांना विप्रो कंपनी नोकरीला लावते असा नियम आहे. आणि तशा भरत्या सुद्धा झालेले आहेत . परंतु अनेक विप्रो कर्मचाऱ्यांचे पाल्य बेरोजगारीच्या खाईत ढकलले गेले असून ते नैराशेच्या , गरतेत आहेत. कंत्राटी कामगारांच्या समस्या जाणून स्थानिक बेरोजगारांना अर्थात साने नगर, न्यू प्लॉट, तांबेपुरा परिसरातील रहिवासी पाल्यांना रोजगार मिळावा ही मागणी अनेक दिवसांपासून होताना दिसत आहे. कंपनीतील एच ,आर ,थोरात साहेब यांच्या वैयक्तिक आकसापोटी अनेक स्थानिक बेरोजगार कामगारांना नोकरीवरून हात धुवावा लागत आहे. व त्यांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र सुरू आहे असा कंपनीतील मानव संसाधन यांच्यावर आरोप होत आहे. तसे न करता स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी कंपनीने पुढाकार घ्यावा असे स्थानिकांचे मत आहे.
Post a Comment