ad headr

Powered by Blogger.

साने नगर येथील स्मशानभूमी शुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत...


अमळनेर [प्रतिनिधी]. साने नगर येथील बोरी तीरावरील स्मशानभूमी काटेरी झुडपांनी वेढली गेली असून तेथे पोहोचण्यासाठी रस्ता नसल्यामुळे प्रेताची अवहेलना होते. प्रत्येक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करून सुद्धा तेथे विकास झाला नाही.
 स्मशानभूमी शुशोभीकरण करण्यासाठी सरकार दरबारी आमदार, खासदार च्या फंडामधून किंवा त्यांच्या वार्षिक निधीतून आर्थिक मदत होते. त्या निधीतून स्मशानभूमीच्या परिसरात श्रद्धांजली सभागृह, वृक्ष लागवड व संवर्धन साठी स्वतंत्र निधी, जमिनीवर पेव्हर ब्लॉक बसवणे पाण्याची उपलब्धता निर्माण करणे पथदिवे आणि विजेची व्यवस्था
करण्यासाठी अनेक हेड खाली निधी संकलन करता येतो. मृत व्यक्तीच्या प्रेताची विटंबना व अवहेलना होऊ नये यासाठी देखरेख करणारा व्यक्ती व त्याची निवड करणे अनिवार्य असते. या सर्व गोष्टींची साने नगर येथील स्मशानभूमी मध्ये आवश्यकता आहे. व त्याची पूर्तता व्हावी अशी नागरिकांकडून अनेक वेळा मागणी होत असते.

No comments