ad headr

Powered by Blogger.

जळगाव महानगरपालिकेची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर.

जळगाव[ प्रतिनिधी] शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत मंगळवार, दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात पार पडली. या सोडतीसाठी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात चिठ्ठीद्वारे पार पडला. व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड-पेखळे, नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता योगेश वाणी आणि नगर सचिव मनोज शर्मा आदी अधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागासवर्ग तसेच महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खाली प्रत्येक प्रभागानुसार (अ, ब, क, ड) आरक्षणाचा तपशील पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आला आहे

No comments