ad headr

Powered by Blogger.

भडगाव नगरपरिषद निवडणूक: २४ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी ४३ केंद्रांवर ३८,३२० मतदार करणार मतदान; प्रशासकीय तयारी पूर्ण!


भडगाव: [ प्रतिनिधी ] सुभाष ठाकरे
. नगरपरिषद निवडणुकीच्या तयारी संदर्भात माहिती देण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शितल सोलट यांनी निवडणुकीच्या संपूर्ण वेळापत्रकासह प्रशासकीय तयारीची माहिती दिली.
​या पत्रकार परिषदेला निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शितल सोलट, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे आणि नायब तहसीलदार भामरे उपस्थित होते.
     
 भडगाव नगरपरिषदेच्या १२ प्रभागांतील २४ नगरसेवक आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी एकूण ३८,३२० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानासाठी शहरात एकूण ४३ मतदान केंद्रे सज्ज असतील. निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यावश्यक सेवा पूर्ण करण्यासाठी आणि पाहणीसाठी सहा सेक्टर अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी सहा वाहने देखील अधिग्रहित करण्यात आली आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी १२ प्रभागांसाठी प्रभागनिहाय प्रत्येक टेबलवर तीन प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. १० ते १७ तारखेपर्यत उमेदवारी अर्ज दाखल करणे, १८ नोहबर छाननी, २१ नोहेबर माघार, २ डीसेबर मतदान व ३ डीसेबर मतमोजणी होणार आहे. मतमोजणी भडगाव तालुका क्रीडा संकुल पाचोरा रोड येथे करण्यात येईल.
मतदान व मतमोजणी साठी नियुक्त कर्मचारी याचे पहिले ट्रेनिंग १९ नोहेबर रोजी तर दुसरे ट्रेनिंग २९ नोहेबर रोजी घेतले जाईल. तसेच उमेदवार यांना उमेदवारी अर्ज दाखल करणे सोईचे जावे तसेच लागणारे दाखले याची माहिती व्हावी यासाठी नगरपरिषद आवार व बस स्थानक परीसर येथे बॅनर लावण्यात आले आहे. शहरात एकही सवेदनाशिल मतदान केद्र नाही अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शितल सोलट यांनी दिली..

No comments