ad headr

Powered by Blogger.

इ. 10 वी व इ 12 वी बोर्ड परीक्षेत वर्ग खोल्यांमध्ये CCTV लावणे बंधनकारक . बोर्ड सहसचिव श्री एम व्ही कदम.

जळगाव   [ प्रतिनिधी ]..  गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव येथे नाशिक विभागीय बोर्डाचे सहसचिव श्री एम व्ही कदम साहेब यांनी मुख्याध्यापक व प्राचार्य यांची आढावा बैठक बोलावली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक विभागीय बोर्डाचे सह सचिव श्री एम व्ही कदम साहेब, माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण मॅडम, उपशिक्षणाधिकारी रागिणी चव्हाण मॅडम, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ वर्षा पाटील, डॉ विजय पाटील प्राचार्य इंजिनिअरींग कॉलेज जळगाव ज्युनिअर कॉलेज संघटना जेष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली 
आढावा बैठकीची प्रस्तावना जूनियर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा शैलेश राणे उपप्राचार्य सरदार जी जी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज रावेर यांनी केली. त्यानंतर गोदावरी फौंडेशनच्या वतीने प्रमुख मान्यवरांना पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव श्रीमती कल्पना चव्हाण यांनी इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षा घेण्यापूर्वी शाळा व इमारतींच्या मध्ये भौतिक सुविधा असणं गरजेचं आहे प
रीक्षा अत्यंत शिस्तबद्ध व काफीमुक्त असल्या पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केले त्यानंतर बोर्डाचे सहसचिव श्री एम व्ही कदम यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या दहावी बारावीच्या परीक्षा या सुरक्षित पार पडल्या पाहिजे
 त्यासाठी संस्था चालकांनी ज्या ज्या इमारतीमध्ये परीक्षा घ्याव्याची असेल त्या वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत गरजेचे असून ते केंद्रप्रमुख किंवा शाळा प्रमुखांच्या कार्यालयास संलग्न असले पाहिजे.त्यासोबत भौतिक सुविधा उदा.स्वच्छता, पाण्याची सुविधा, वर्ग खोल्या इत्यादी सुविधा असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वर्गात फॅन असले पाहिजे इमारतींना कंपाउंड असले पाहिजे विद्यार्थी परीक्षेला प्रसन्न मनाने बसण्यासाठी हे वातावरण तयार करावे शासन कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवणार आहे कुठल्याही सेंटरवर परीक्षार्थींना कॉपी करता येणार नाही यासाठी काही निर्बंध लावावे परीक्षा हॉलमध्ये जाण्यापूर्वी तपासणी करावी अशा विविध सूचना या यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा शैलेश राणे यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी सौ रागिणी चव्हाण मॅडम यांनी मानले.

No comments