ad headr

Powered by Blogger.

साने नगर येथील व्हाल्वचे काम होणार कधी? अनेक अपघात होऊन सुद्धा नगरपालिका पाणीपुरवठा विभाग अनभिज्ञ..

अमळनेर [ प्रतिनिधी ]..प्रभाग क्रमांक दोन मध्ये पाणीपुरवठ्याचा वाल गेल्या तीन वर्षांपासून लिकेज असून त्याच्यावर लोखंडी जाळी तुटलेल्या अवस्थेत असून त्या जाळीमध्ये पाय पडल्यास अनेक अपघात झालेले आहेत. बऱ्याच लोकांचे पाय दुखापत होऊन त्यांना प्लास्टर लागले परंतु नगरपालिका प्रशासन शांत आहे अजून किती लोकांचा अपघात होण्याची वाट पाहत आहेत. पाणीपुरवठ्याचे मग रूट अधिकारी दूरध्वनी केल्यास फोन उचलत नाही ज्यांची जबाबदारी आहे ते जबाबदार अधिकारी त्या वाळूला बघण्यासाठी एकदा सुद्धा आले नाहीत अनेक तक्रारी आणि निवेदन दिल्यानंतर सुद्धा कोणीही त्या समस्येचा निर्णय करण करण्यासाठी येथे पोहोचला नाही त्यामुळे साने नगर येथील रहिवाशी अत्यंत संतप्त झाले असून. नगरपालिका प्रशासनाने त्वरित जलद गतीने अत्यंत तातडीने त्या व्हालच्या जाळीचे काम करून द्यावे अन्यथा नागरिकांच्या रोशास सामोरे जावे लागेल याची नोंद घ्यावी. तो अत्यंत रहदारीचा रस्ता असून दोन चाकी चार चाकी रिक्षा तसेच पायी चालणारे रहिवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता असते म्हणून गावाच्या सुविधेसाठी व सोयीसाठी त्वरित त्या वालच्या खड्ड्यावर जाळी बसवावी अशी मागणी होत आहे. या दोन दिवसात जर जाळी बसली नाही तर नगरपालिकेवर मोठा मोर्चा येणार आहे, याची खबरदारी ठेवावी. मोर्चादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास नगरपालिका प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
साने नगर मधील रहिवासी नागरिक यांची नावे खालील प्रमाणे 

No comments