प्रताप कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांची निवड. ●संगणकशास्त्र विभागाचे यश● . हेमंत गायकवाड, प्रेम साळुंखे,रोहन पाटील यांची विविध पदासाठी निवड
अमळनेर, [ प्रतिनिधी ] ५ ऑक्टोबर — प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर येथील संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या ऑफ-कॅम्पस भरती मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या विभागातील दोन विद्यार्थ्यांनी नामांकित कंपन्यांमध्ये आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. कु. हेमंत दिपक गायकवाड यांची Wipro कंपनीत Scholar Trainee म्हणून निवड झाली असून, त्याला कंपनीकडून BITS, पिलानी या सुप्रसिद्ध संस्थेतून M.Tech पदवी पूर्ण करण्याची संधी देखील मिळणार आहे,
तो सीसीएमसी विभागातील ग्रंथालयाचा वाचक आहे तर कु.प्रेम भगवान साळुंखे याची Amazon मध्ये Data Analyzer म्हणून निवड झाली आहे. तसेच, कु. रोहन प्रमोद पाटील याची भारतीय नौदलात (Indian Navy) निवड झाल्याने महाविद्यालयाच्या गौरवात भर पडली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे व्यवस्थापन मंडळ, प्रभारी प्राचार्य, संगणकशास्त्र विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.
त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभागाचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि विद्यार्थ्यांची मेहनत निर्णायक ठरली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment