प्रताप महाविद्यालयात कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न
अमळनेर (ता. १६ ऑक्टोबर) :- [ प्रतिनिधी ].
तालुका विधी सेवा समिती व वकील संघ, अमळनेर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अँटी रॅगिंग समिती, प्रताप महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रस्तुत शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रवीण पी. देशपांडे (सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर, अमळनेर) उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून ॲड. आर. व्ही. निकम, ॲड.किशोर बागुल, ॲड.किरण पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध कायदेविषयक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
वक्त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, लैंगिक छळ प्रतिबंधक कायदे, महिलांची सुरक्षितता, विशेषतः विद्यार्थिनींनी फसवणूक व लैंगिक छळाच्या घटनांपासून सतर्क राहावे, संशयास्पद संपर्क टाळावा आणि कोणत्याही अनुचित प्रकाराची वेळेत तक्रार करावी, असा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एच. डी.जाधव यांनी भूषविले. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना नियमावलीची माहिती दिली. कार्यक्रमाचे समन्वय व सूत्रसंचालन प्रा. हेमंत पवार (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग) यांनी केले, तर उप प्राचार्य प्रा.डॉ.कल्पना पाटील यांनी आभार मानले.
प्रस्तुत कार्यक्रमास खानदेश शिक्षण मंडळातील सर्व सन्मानीय पदाधिकारी, प्राध्यापक प्रतिनिधी, उपप्राचार्य, कुलसचिव यांनी सहकार्य केले.
या प्रसंगी संस्था उपाध्यक्षा सौ. माधुरीताई पाटील, ॲड. कछवा सर,
प्रा. सुनिल राजपूत, प्रा.अवित पाटील, तसेच प्रा.डॉ.नलिनी पाटील, प्रा.मनिषा पाटील, प्रा.वृषाली वाकडे, प्रा.वैशाली महाजन, प्रा.हेमलता सूर्यवंशी, प्रा.पुष्पा पाटील व प्रा.चित्रा मॅडम उपस्थित होत्या.
महाविद्यालयातील शिक्षकवर्ग, विद्यार्थिनी आणि एनएसएस स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सदरच्या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Post a Comment