ad headr

Powered by Blogger.

उन्मेषदादांची लाभक्षेत्र प्राधिकरणावर धडक...!

     जळगांव येथे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण येथे आज मा खा.उन्मेशदादा पाटील व शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ,मा.लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात आली,
     गिरणा धरण १००% भरले असून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सोडत असल्याने पाणी वाहून जात आहे,काही शेतकरी २१ दिवसाचा खंडमधे पिकांची वाढ खुंटली,१६ आगस्टला एका दिवसात ढगफुटी सारखा पाऊस पडून शेतकरी संकटात सापडला आहे, म्हणून नदीमधे पाणी न सोडता थेट जामदा व दहीगाव बंधा-यातून कनाल द्वारे चा-यामधे सोडल्यास रब्बीचे पिक चांगले येण्यासाठी शक्यता आहे, 
म्हणून आज उन्मेष दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अधिक्षक अभियंता भोसले साहेब यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर वाचा चर्चा केली, लगेच त्यांनी उपकार्यकारी अभियंता, धरणगांव तुषार राजपूत साहेब यांना फोन लावून कॅनल रिपेअर करून दोन दिसात पाणी सोडावे असे सांगितले त्यामुळे शेतकऱ्यांचा विहीर भरण साठी फायदा होईल व रब्बी हंगामासाठी पुरेसे विहीरीना पाणी येईल,आज २० हजार हेक्टर ऐवजी १२ हजार हेक्टरला पाणी देतात, परंतू ८ हचार हेक्टर ला का पाणी पोहचत नाही, त्यांच्यासाठी ही उपाय योजना करावी असे सांगितले,
     रब्बी हंगामात पहीले आवर्तन  जानेवारीला सोडतात ते डिसेंबरला सोडावे अशी मागणी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिष्टमंडळाने केली.
    या शिष्टमंडळात.  मा खासदार शिवसेनेचे नेते उन्मेश दादा पाटील शिवसेनेचे उपनेते रावेर लोकसभा व नंदुरबार जिल्ह्याचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, निलेश चौधरी नगराध्यक्ष धरणगाव, महानगर प्रमुख शरद आबा तायडे , भाऊसाहेब सोनवणे, प्रशांत सुरडकर,प्रमोद घगे, राकेश घुगे, सचिन चौधरी, महेन्द्र पाटील, भाऊसाहेब पाटील  दिनेश बोरसे (चाळीसगाव), निलेश महाजन, चन्द्रकांत शर्मा, प्रशांत परदेशी, मकबूल पठाण (भुसावळ)यांच्यासह शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments