ad headr

Powered by Blogger.

भूमिपुत्र दादा,, या भूमातेच्या लेकरांची आबाळ होते आहे,, शिव रस्ते, शेत रस्ते पानंद रस्ते यांच्यावरून चालणे या पंचवार्षिकला तरी सुखकर होईल का?*

     अमळनेर [ प्रतिनिधी ].... गेल्या विधानसभेच्या निवडणूक कार्यक्रम लागण्याआधी अनेक शेतकऱ्यांना अर्थात भूमिपुत्रांना घेऊन आपल्या कार्यालयात आलो होतो. आपण तेव्हा आपत्ती व्यवस्थापन तथा पालकमंत्री होते. साने नगर बोरी काठ परिसरातील गावातील अनेक शेतकरी जे शिवरस्ते तथा शेत रस्ते यासाठी त्रस्त आहेत आले होते. आपण त्यांना शब्द दिला होता की या निवडणुकीत जर मी पुन्हा निवडलो तर तीन महिन्याच्या आत  तालुक्याचा 
शिव रस्ते आणि पानंद रस्त्याचा प्रश्न निकाली काढेल. याला साक्षीदार मी स्वतः संदीप सैंदाणे होतो. साने नगरच्या रहिवाशांनी आपणास झालेल्या मतदानाच्या 95 टक्के मतदान दिले. 

पुन्हा शेतकऱ्यांस शिवरस्त्यांचा प्रश्न भेडसावत आहे. पाऊस आला म्हणजे अत्यंत जिेकरीने शेतात जावे लागते. भूमिपुत्र आमदार दादांनी त्या रस्त्यांवर निदान मुरूम टाकायची तरी व्यवस्था करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. कारण शेतातील कामे करण्यासाठी शेतात जाणे अनिवार्य असते आणि चिखलमय रस्त्यांमुळे मजुरांना पायी सुद्धा घेऊन जायला कठीण होऊन जाते म्हणून मजूर सुद्धा शेतात यायला धजावत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. तालुक्यातील शिव रस्त्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्यातून आपणच मार्ग काढाल अशी अपेक्षा जनता करते आहे.

No comments