ad headr

Powered by Blogger.

अमळनेर विधानसभा क्षेत्रातील आमदार अनिल पाटील यांनी.प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांचे प्रातिनिधिक स्वरूपात फीत कापून गृहप्रवेशासाठी केले उद्घाटन...


.             अमळनेर [ प्रतिनिधी. ]... 
15 ऑगस्ट स्वतंत्र्य दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहरातील प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधकम पूर्ण झालेल्या घरांना मा. आमदार श्री. अनिल भाईदास पाटील यांनी भेट देवून प्रातिनिधीक स्वरुपात हेडावे रोड वरील लाभार्थी श्री. बारकु गिरधर पाटील, सुरेखा गोपाल चौधरी, अनिल भोई, या लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमांचे फित कापून व श्रीफळ वाहून उदघाटन केले सदर कार्यक्रमांसाठी मा. उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी, रविंद्र चव्हाण, नगर अभियंता सुनिल पाटील,
 डिगांबर वाघ, अजित लांडे, नगररचना सहाय्यक मयुर तोंडे, सौरभ बागड, लेखापाल सुदर्शनराज शामनानी, कृणाल कोष्टी, विदयुत अभियंता कुणाल महाले प्रधान मंत्री आवास योजना अभियंता धिरज पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते. तसेच सदरील लाभार्थ्यांनी महावितरण विषयी तक्रार केली असता मा. आमदारांनी तात्काळ महावितरण अभियंता यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करुन संबंधीत तक्रारी निकाली काढण्याकामी निर्देश दिले नाशिक विभागात अमळनेर नगरपरिषद वैयक्तीक घरकुले पूर्ण करण्यात प्रथम क्रमांकावर असल्याने असल्याबद्दल मा. आमदार यांनी नगरपरिषदेचे विशेष कौतुक केले.

No comments