अमळनेर तालुक्यातील शेतकरी दुष्काळाच्या गर्द छायेत लीन.. लोकप्रतिनिधी, प्रशासन,राज्यकर्ते उदासीन..
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात तुरळक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी करून टाकली. दोन महिने झाले तरी तालुक्यामध्ये दमदार पाऊस झाला नाही. पेरलेली पिके करपायला सुरुवात झाली. अर्ध्या अधिक तालुक्यांमध्ये पिके जळू लागले. हा संपूर्ण हंगाम हातातून गेला. जमिनीत पाणी नसल्यामुळे पिके ऊन धरू लागली पिके सुकून चालली. शेतकऱ्यांनी पावसाची वाट बघणे सोडून दिले. हातातील पैसा पेरणीमध्ये टाकून दिला. त्यात बियाणांवर खूप खर्च झाल्यामुळे शेतकरी हा बेजार झाला आहे. काय करावे आणि काय करू नये असा सवाल त्याच्यापुढे उभा ठाकला आहे. आजी माजी लोकप्रतिनिधी उदासीन आहेत. प्रशासन आणि शोध पत्रकार शेतकऱ्यांच्या समस्या वर काही बोलायला तयार नाहीत. अत्यंत बेजबाबदारीची भावना या बळीराजाला संबंधितांबद्दल सतावत आहे. संपूर्ण उपजीविका शेतीवर असणाऱ्या शेतकऱ्यांना कोणी हात ऊसणवार किंवा कर्जाचे पैसे सुद्धा द्यायला तयार नाही. अमळनेर तालुक्यात बेरोजगारी वाढल्यामुळे हाताला काम नाही. त्यामुळे उपजीविका करणे सुद्धा जड पडते.
अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी यांच्या बद्दल आवाज उठवून प्रशासनाला कामाला लावले पाहिजे त्या अनुषंगाने तालुक्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी शेतशिवारावर फिरून पिकांची पाहणी करून पंचनामे करून सरकार दरबारी पाठवली पाहिजे व त्वरित अंमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी जोर धरू लागली आहे. केविलवाण्या परिस्थितीत शेतकरी बांधव जगत आहे.
Post a Comment