ad headr

Powered by Blogger.

बोहरा इंग्लिश मीडियम स्कूल येथे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा..



       अमळनेर 26. प्रतिनिधी 
 विद्यार्थी पालकांच्या होणाऱ्या अपघातांमुळे होते हशा..
रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याची होते मागणी. 
अमळनेर प्रतिनिधी धुळे रस्त्यावरील अमळनेर हद्द संपल्यानंतर मंगरूळ रस्त्याला डाव्या कडेला 300 मीटर अंतरावर सायरा देवी इंग्लिश मीडियम स्कूल आहे. शाळेचे बांधकाम अत्यंत सुबक देखणे व विशाल आहे शाळेचे प्रांगण सुद्धा खूप मोठे असून अंमळनेर शहरातील तसेच पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी तेथे ज्ञानार्जनासाठी येतात शेकडो विद्यार्थीनींनी शिक्षण घेण्यासाठी ती शाळा निवडली आहे कारण तेथील शिक्षण हे उच्च दर्जाचे आहे. त्या अनुषंगाने दिवसा गणित तिथे विद्यार्थी संख्या वाढत आहे. परंतु मुख्य रस्ता ते शाळा प्रांगण प्रवेशद्वार याला जोडणारा रस्ता अत्यंत चिखलमय आणि खड्ड्यांनी युक्त आहे. थोडा जरी पाऊस आला तरी तेथे वाहने चालवण्यास कसरत करावी लागते त्यामुळे अपघात होणे नित्याचेच झालेले आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना पालकांचे वाहने निसटतात व तेथे त्यांचा हशा होतो. अपघातामुळे बऱ्याच वेळा हातापायांना इजा होते. म्हणून तो साधारण तीनशे मीटरचा रस्ता कॉंक्रिटीकरण करून मिळावा, अशी पालकांची कायमस्वरूपी  मागणी आहे. संचालकांनी लक्ष देऊन तो रस्ता बनवावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

No comments