ad headr

Powered by Blogger.

वरदडीच्या ठिकाणी ,सप्तपर्णी वृक्ष कोसळण्याच्या स्थितीत. वनविभाग , न पा प्रशासन, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची लक्ष देण्याची गरज.💥.


           अमळनेर  प्रतिनिधी... 
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरातील मंगलमूर्ती बँक चौकातील, प्रबुद्ध विहाराच्या ईशान्य कोपऱ्याचे सप्तपर्णी जातीचे विशाल वृक्ष बुंध्याला जळून अर्धे अधिक खाक झालेले आहे, झाडावरचे वजन बुंध्याकडून सांभाळले जात नाही असे प्रत्यक्षदर्शी बघितल्यावर वाटते. पावसाळ्याचे दिवस असून. सोसाट्याचा वारा आल्यास ते झाड ऊनमळून पडेल याची शक्यता नाकारता येत नाही. त्या झाडाच्या खाली अनेक प्रवासी सावलीला उभे असतात व तेथे एसटी बस तसेच खाजगी वाहनांचा थांबा आहे. कारण तो मोठा चौक असून अनेक गाव खेड्यांना तसेच शिरपूर, दोंडाईचा ,शिंदखेडा. गलवाळे, झाडी, मुडी मांडळ पर्यंत, आणि धाड मारवड पाडळसरे आशा अनेक गाव खेड्यांचा एसटी थांबा तिथे आहे.
झाड जिर्ण झाले असून जळलेल्या अवस्थेत आहे. संबंधित प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांनी त्वरित ते ते वृक्ष पाळावे व तेथे होणाऱ्या अनर्थ ,अपघात ,किंवा जीवित हानी टाळावी. अशी गेल्या कित्येक दिवसापासून नागरिकांची मागणी आहे.


No comments