पत्नीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी भडगाव पोलिसात निवेदन
भडगाव { प्रतिनिधी } .सुभाष ठाकरे
भडगाव पेठ माहेरवाशीण तृप्ती रेवण पवार हिस अमानुषपणे मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा तिचा पती रेवण प्रमोद पवार यास कठोरात कठोर शिक्षा व्हावी. माणुसकीला काळीमा फासणारी घटना भडगांव पेठ भागात घडली आहे. सदर घटनेत पती रेवण पवार हा घरी येत अत्यंत निर्दयीपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण करत चारचाकी गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यात तृप्ती पवार गंभीर जखमी झाली. तृप्तीस वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या परिवारास देखील मारहाण केली. रेवण प्रमोद पवार यास अटक करण्यात आली आहे अशी माहिती पी. एस. आय. गणेश मस्के यांनी दिली. आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी.
भडगांव माहेरवाशीन शारदा बागुल बाबत असेच घडले. आणि तिला जीव गमवावा लागला. याची वेळीच दखल घ्यावी. अशा आशयाचे निवेदन निर्मल सीडस संचालिका वैशाली सुयवंशी यांचे मार्गदर्शनात माजी नगरसेविका योजना पाटील, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, माजी उपसभापती राजेंद्र पाटील, शहरप्रमुख मनिषा पाटील, ता. प्रमुख चेतन पाटील, युवाधिकारी भैय्या राजपूत, युवासेना प्रमुख रोनित अहिरे, समन्वयक भूषण देवरे, पंडित पाटील, उपप्रमुख सत्यजित पाटील, मनोज पाटील, रमेश पाटील, प्रियदर्शनी पाटील, स्मिता बोरसे, पौर्णिमा पाटील, दत्तात्रय पाटील आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पी. एस. आय. गणेश मस्के यांना दिले.
Post a Comment