विवाहितेच्या निर्घृण हत्या प्रकरणी भडगावात प्रचंड आक्रोश मोर्चा
भडगाव प्रतिनिधी सुभाष ठाकरे.. भडगाव येथील माहेरवाशीण कै. शारदा उर्फ (पूजा) बागुल दि. २९ मे रोजी तिचा पती, नणंद, सासू, सासरे आणि इतर संशयित यांनी अमानुषपणे माणुसकीलाही काळिमा फासेल अशा क्रूर पद्धतीने अनन्वित अत्याचार करून तिला धुळे येथे मारहाण करून खून केला. या कृत्या विरोधात समस्त. भडगावकारांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे.
तरी सर्व समस्त भडगाव शहर व तालुका कारांनी आपल्या कन्येला, बहिणीला त्वरित न्याय मिळावा. व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. यासाठी आक्रोश मोर्चात कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
तारीखः- ६ जून २०२५ वार- शुक्रवार
वेळः- सकाळी ९ वाजता
मोर्चाची सुरुवात ठिकाणः भडगाव नगरपरिषद जवळ बाजार चौक भडगाव. ते तहसील कार्यालय.
Post a Comment