महसूल विभागामार्फत जनतेच्या तक्रारी निवारण व प्रशासन अधिक लोकाभिमुख,कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी समाधान शिबिराचे आयोजन
भडगाव प्रतिनिधी. सुभाष ठाकरे
भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता शेतकरी, विदयार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकालात काढणे तसेच प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करणेसंदर्भात उपसचिव महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्रमांक/2025/प्र.क्र. 34/ई-8 दिनांक 25 मार्च 2025 नुसार आदेशित केलेले आहे. त्या अनुषंगाने पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील यांचे अध्यक्षतेखाली व मा.श्री. भूषण अहिरे, उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग यांच्या उपस्थितीत भडगाव तालुक्यातील गोंडगाव मंडळ भागात दिनांक 26/05/2025 रोजी सकाळी 10.00 वाजता श्रीराम मंदिर सभागृह मौजे गोंडगाव येथे समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात भडगाव तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमार्फत गोंडगाव मंडळ भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विदयार्थी यांना शासनाचे विविध शासकीय योजनांची माहिती देणेकामी जवळपास 10 स्टॉल लावण्यात आले होते. शिबीरात नागरिकांना शासनाच्या विविध कार्यालयांशी संबंधित योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांना स्तनदा माता योजनंअंतर्गत बेबी केयर किट, 7/12 उतारे, जातीचे दाखले, प्रधानमंत्री घरकूल योजनेंअंतर्गत घरकूल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी वाळू साठा मिळालेले लाभार्थी, गुणवंत विदयार्थी, ईकेवायसी अनुदान, अंत्योदय योजना लाभार्थी, संगायो श्रावणबाळ योजना लाभार्थी, उत्पन्न दाखले, नॉन क्रिमीलेयर दाखले व इतर लाभाचे वितरण आमदार मा. श्री. किशोरआप्पा पाटील यांचेहस्ते करण्यात आले. सदर शिबीरात भडगाव तालुक्यातील व गोंडगाव मंडळ भागातील जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उस्फुर्तपणे प्रतिसाद नोंदविला. असे तहसीलदार शितल सोलट मॅडम यांनी कळविले.
Post a Comment