ad headr

Powered by Blogger.

जळगाव शहरातील रस्ते व गटारी विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार सुरेश भोळे ह्यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ह्यांच्याकडे मागणी

जळगाव प्रतिनिधी
दि.२३/०६/२०२४



जळगाव - शहरातील कॉलनी भागातील रस्ते व गटारींची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दळण वळणासाठी अत्यंत जिकरीचे व त्रासदायक झाले आहे. पावसाच्या पाण्याने खराब रस्त्यांवर पाणी साचून अपघाताची स्थिती निर्माण झाली आहे व पावसाळ्यात गटारीच्या दुरावस्थेमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

जळगाव शहरांच्या विकास कामांसाठी १६२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना.  एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना जळगाव शहराचे लोकप्रिय आमदार श्री. सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांनी मागणी केली आहे.
लवकरच जळगाव शहरातील विकास कामांना सुरुवात होणार असून, याचा पाठपुरावा स्वतः आमदार श्री. सुरेश भोळे (राजू मामा) हे करणार आहेत..


No comments