जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विविध मागण्यांसाठी आमदार सुरेश भोळे (राजु मामा) यांनी दिले आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन
जळगाव प्रतिनिधी
दि.१९/०६/२४
जळगाव - शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे एम.आर.आय.मशीन उपलब्ध करून देण्याबाबत व जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना नोकर भारतीतून आरोग्य विभागात नोकरीची संधी उपलब्ध होऊन रोजगार मिळावा यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर, नर्सेस, वार्ड बॉय यांची रिक्त पदे भरण्याबाबत शहराचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांनी आरोग्यमंत्री मा.ना.हसनजी मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली.
याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली व यावर नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन या प्रसंगी आमदार राजु मामा भोळे यांना दिले आहे.
Post a Comment