ad headr

Powered by Blogger.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना खंडणीची धमकी माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश भाेळे याच्या विरुद्ध जिल्हापेठ पाेलीसात तक्रार दाखल

जळगाव प्रतिनिधी
दि.०६/०६/२४



जळगाव- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वयंघोषित माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश कडू भोळे याच्याकडून माहिती अधिकाराचा गैरवापर करून ब्लॅकमेल करीत वेगवेगळ्या स्वरुपात खंडणी मागत आहे. सदरच्या त्रासामुळे कर्मचाऱ्यांना काम करीत असताना असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. असे निवेदन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जि.प. सी.ई.ओ. अंकित यांना आज सकाळी ११.३० वाजता दिले. दरम्यान याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात कलम १८६, ५०४,५०५ नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांनी माहिती अधिकार कार्यकर्ता दिनेश भोळे यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज दिलेला होता. याबाबतची माहिती घेण्याकरिता कार्यालयात दि.२८ मे राेजी दुपारी २ वाजता माहिती मिळण्याबाबत प्रकल्प संचालकांच्या दालनात भाेळेंनी भेट घेतली. सदर भेटीअंती प्रकल्प संचालकांच्या आदेशान्वये दुपारी ३ वाजता येवून आपली माहिती प्राप्त करुन घ्यावी, असे सांगितले, तथापि भोळे हे ३ वाजता कार्यालयात माहिती घेण्याकरिता आले नाही. परंतु ते ५.१५ वाजेच्या सुमारास जिल्हा अभियान व्यवस्थापक हरेश्वर भोई यांच्या दालनात येवून मोठमोठ्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत खंडणीची मागणी करीत जीवेठार मारण्याची धमकी जिल्हा व्यवस्थापक, संपादवणूक यांना दिली. सदरचा प्रकार हा वांरवार होत असून उमेद अभियानातील जिल्हा व तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांना सुध्दा अशाच प्रकारचा त्रास दिनेश भोळे यांच्याकडून हाेत आहे. त्यामुळे अभियानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता, भितीदायक व असुरक्षित वातावरण कार्यालयीन कामकाज करतांना निर्माण झाले आहे. भोळे स्वंयघोषित माहिती अधिकार कार्यकर्ता असून कार्यालयास मागितलेली माहिती नियमाप्रमाणे त्यांना देण्यात आलेली आहे. असे असूनही भोळे मागील २ ते ३ वर्षांपासून या अभियानातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातत्याने त्रास देत आहेत. तसेच शासकीय कामाकाजात अडथळा आणत आहे. या कर्मचाऱ्यांविरुध्द माहिती अधिकाराचा गैरवापर करुन ब्लॅकमेल करुन वेगवेगळ्या स्वरुपात खंडणी मागत आहे. सदरच्या त्रासाला कर्मचारी कंटाळले आहेत. दिनेश भोळे हे अभियानात काम करणाऱ्या काही महिलांना हाताशी घेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत. दिनेश भोळे यांच्यावर धमकी व खंडणी मागण्याबाबतचा गुन्हा दाखल आहे. तरी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत आपण वैयक्तिक लक्ष घालावे, असे निवेदन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी दिले हाेते. याची दखल घेत. जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल झाली आहे.  

निवेदनावर यांच्या आहेत सह्या....

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या जिल्हा भरातील ३३ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत. त्यात हरेश्वर भाेई, लाेडेश जाेशी, आत्माराम सपकाळे, प्रवीण गावंडे, राहुल ठाेसरे, सीमा खाडे, जयदीप माेरे, हर्षल दुसाने, कैलास गाेपाळ, विजय पाटील यांच्यासंह ३३ कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

जिल्हापेठला तक्रार दाखल... 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांना माहिती अधिकाराचा धाक दाखवून खंडणीसाठी शिवीगाळ करणाऱ्या दिनेश भोळे यांच्यावर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा कलम १८६, ५०४,५०६ नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.

No comments