ad headr

Powered by Blogger.

'प्रताप' ची सुवर्णा पाटील यांची कर सहाय्यक पदी निवड


अमळनेर - प्रताप कॉलेज मधील गणित व करिअर कौंसेलिंग सेंटरची विद्यार्थिनी सुवर्णा बाळू पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या कर सहाय्यक परीक्षेत इतर मागासवर्गीय प्रवर्गात 26 व्या रँकने उत्तीर्ण झाली आहे.या पूर्वी तिची निवड पीएसआय म्हणून झाली होती.अत्यंत जिद्दीने व परिश्रमाने तिने हे यश प्राप्त केले.या यशात तिची आई,वडील,पती-पीएसआय महेश निकम,बहीण,मामा-गिरीधर मोरे,डॉ.नलिनी पाटील व प्रा.ईश्वर पाटील यांचे योगदान आहे.
      स्पर्धा परीक्षेत मिळविलेल्या या यशाबद्दल खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल,जेष्ठ संचालक हरी भिका वाणी, डॉ.संदेश गुजराथी,विनोद पाटील,योगेश मुंदडे,कल्याण पाटील,सीए नीरज अग्रवाल,चिटणीस तथा प्राचार्य डॉ.अरुण जैन,सह चिटणीस डॉ.धीरज वैष्णव, डॉ.जे.बी.पटवर्धन, रेक्टर डॉ.अमित पाटील,करिअर कौंसेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे,डॉ.हर्षवर्धन जाधव,डॉ.धनंजय चौधरी,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.आर सी सरवदे,डॉ.कैलास निळे,डॉ.माधव भुसनर,डॉ.रवी बाळसकर, डॉ.मुकेश भोळे,डॉ.तुषार रजाळे,डॉ.रमेश माने,प्रा.जयेश साळवे,डॉ.वंदना भामरे,प्रा.रोहन गायकवाड, श्री.राकेश निळे,श्री.विजय ठाकरे आदींनी अभिनंदन व कौतुक केले.


No comments