लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा प्रचार व प्रसार योजनांची अंमलबजावणी कार्यशाळेचे ५ फेब्रुवारी रोजी आयोजन
जळगाव- प्रतिनिधी
दि.04/02/2024
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजना समाजातील गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या, कोणीही गरजू लाभार्थी वंचित राहू नये. त्या योजनांचा प्रचार व प्रसार अंमलबजावणी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील योजना संदर्भात कार्यशाळा दि.५ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक ११.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन. मायादेवी मंदिरासमोर महाबळ रोड, जळगाव.येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाकरिता जिल्ह्यातील मातंग समाजातील किमान ३००ते ४००लोक तसेच मान्यवर कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. यात यशस्वी उद्योजक, महामंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी तसेच यशस्वी लाभधारक व नियमित कर्ज वसुली भरणारे लाभधारक यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. तसेच मंजूर कर्ज प्रकरणांचा धनादेश वितरण करण्यात येणार आहे. तरी समस्त मातंग समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ताराचंद कसबे जिल्हा व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ जळगाव यांनी केले आहे.

Post a Comment