ad headr

Powered by Blogger.

राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने मराठा महासंघाच्या वतीने पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
दि.२०/०१/२४


चाळीसगाव -अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने खडकी बुद्रुक येथील मथुराई माध्यमिक विद्यालयात 12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता  राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला जळगाव जिल्हा संकल्प संपर्क प्रमुख खुशाल बिडे यांनी दीप प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण केला. मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी  राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर   जयंती निमित्ताने पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने 2जानेवारी 2024 रोजी राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्ताने खडकी बुद्रुक येथील मथुराई माध्यमिक विद्यालयात  निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 12 जानेवारी 2024 च्या राजमाता जिजाऊ जयंती च्या दिवशी मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते निबंध स्पर्धेत प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या सातवी ते बारावी मधील अठरा विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच निबंध स्पर्धेत भाग घेणाऱ्या 101 विद्यार्थिनींना देखील  प्रमाणपत्र देण्यात आले. राजमाता जयंती निबंध स्पर्धेत इयत्ता सातवी प्रथम क्रमांक कु. दिव्या अविनाश कुमावत,द्वितीय क्रमांक कु. सिद्धी  विनायक मांडोळे, तृतीय क्रमांक कु. दुर्गा गणेश म्हस्के, इयत्ता आठवी प्रथम  कु. दिपाली समाधान मुंगसे, द्वितीय क्रमांक  कु. दिपाली सुपडू जाधव, तृतीय क्रमांक  कु. मयुरी गणेश अहिरे, इयत्ता नववी प्रथम क्रमांक कु. नम्रता संतोष घुमरे, द्वितीय क्रमांक  कु. मयुरी विनोद झाल्टे, तृतीय क्रमांक कु. रूपाली दत्तू मांडोळे, इयत्ता दहावी प्रथम क्रमांक  कु. स्वाती आबा चव्हाण, द्वितीय क्रमांक  कु. विशाखा सुरेश चव्हाण, तृतीय क्रमांक कु. मान्यता संतोष घुमरे, इयत्ता अकरावी  प्रथम क्रमांक कु. वैष्णवी अण्णा साळुंखे, द्वितीय क्रमांक  कु. साक्षी समाधान चिकणे, तृतीय क्रमांक  कु. निकिता राजेंद्र आगोणे, इयत्ता बारावी प्रथम क्रमांक  कु. मोहिनी युवराज बेलदार, द्वितीय क्रमांक  कु. रेणुका विलास सानप, तृतीय क्रमांक कु. धनश्री विनोद भालेकर इत्यादी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष  डॉ. बी. बी. भोसले, जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ पाटील  उपजिल्हा संपर्कप्रमुख  कैलास पाटील, तालुका अध्यक्ष निळकंठ पाटील, चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील, कैलास देशमुख, मोतीराम मांडोळे, अशोक भोसले, नाना शिंदे,दीपक वाघ, प्रा. राकेश सोनवणे तसेच खडकी बुद्रुक मथुराई माध्यमिक विद्यालय येथील शिक्षक कर्मचारी वृंद उपस्थित होते.

No comments