धरणगांव: गोंडगाव ता.भडगाव येथील ८ वर्षीय मुलिवर अत्याचार करुण दगडाने ठेचुन निर्घन खुन करण्यात आला. या घटनेचा उलगडा होऊ नये म्हणून त्या मुलीचा मृतदेहाचा नायनाट करण्यासाठी त्या चिमुकलेला कडबा कुट्टीत ३ दिवस डांबण्यात आले. या घटनेचा मुख्य आरोपी स्वप्नील उर्फ सोन्या पाटील याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यावर कोर्टाच्या माध्यमातून खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देऊन पीडित परिवाराला न्याय द्यावा, अन्यथा टायगर ग्रुप महाराष्ट्रभर आंदोलन करेल आणि होणाऱ्या नुकसानास सर्वस्व शासन आणि प्रशासन जबाबदार असेल या आशेने निवेदन पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांना टायगर ग्रुप धरणगांव यांच्या वतीने देण्यात आले. निवेदन देते वेळी टायगर ग्रुप धरणगांव तालुका अध्यक्ष कल्पेश कोळी, चेतन पाटील,शहेबाज शाह, भुषण महाजन, कृष्णा सुतार, राज शिरसाठ, प्रमोद जयराज, प्रशांत पाटील, शुभम चौधरी, शे वसीम , शे सईद ,गणेश आहिरे, किसन राठोड, गोपाल कुराडे ,विजय मोहिते ,तेजस पाटील ,प्रकाश मोहिते, धिरज कोळी, रितेश शिंदे, मयुर पाटील, हर्षल पाटील, भुषण पाटील, श्रिक कोळी, वाल्मीक गुंजाळ, अनुप गोपाल, आदी टायगर ग्रुप सदस्य उपस्थित होते.
Post a Comment