आर्थिक परिस्थितीवर मात करत कु.सीमा शिरसाठ हिने एम. पी. एस.सी. परीक्षेत ओ. बी. सी. प्रवर्गातून ४ थी रँक मिळवून केले यश संपादन
भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे
दि.१६/०७/२०२३
भडगांव:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत मंत्रालयीन लिपिक, टॅक्स असिस्टंट ( जीएसटी) पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत टॅक्स असिस्टंट ( जीएसटी) पदासाठी ओबीसी महिला या गटातून कु. सीमा राजेंद्र शिरसाठ हिने राज्यातुुन ४ रॅक मिळवत यश संपादन केले आहे. सीमा ही नाभिक समाज मंडळाचे सभासद राजेंद्र रामचंद्र शिरसाठ यांची कन्या आहे. कु. सीमा राजेंद्र शिरसाठ हिचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन शाल व पुष्पगुुच्छ् देऊन नाभिक समाज वतीने अध्यक्ष संजय पवार याच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सीमा शिरसाट हिची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती तशी साधारण, वडील सलून चालवतात, पदवी पर्यंतचे शिक्षण झाल्यावर तिने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. मोठ्या शहरात क्लास लावण्यचा विचार न करता भडगांव शहरातच परीक्षेचा अभ्यास करत यश मिळविले. सुरवातीच्या काही परीक्षेत अपयश देखील आले. ऐन परीक्षेच्या काळात वडिलांना उपचार साठी दाखल करावे लागले होते. पण सीमा खचली नाही. तिने स्वतः वर विश्वास ठेवला व यश खेचून आणले. तिची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे मंत्रालयीन क्लर्क तसेच टॅक्स असिस्टंट (GST) अश्या दुहेरी पदावर झाली. अजून मोठ्या पदावर जाण्याचे तिचे स्वप्न आहे. सीमा शिरसाठ हीस सारथी अभ्यासिकेचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी उपाध्यक्ष रविंद्र शिरसाठ, सचिव अँड. भरत ठाकरे, खजिनदार दिपक शिरसाठ, कार्यकारणी सदस्य सुभाष ठाकरे, दिलीप वेळीस, भगवान नेरपगारे, दिलीप शिरसाठ, सुर्यभान वाघ, विनोद शिरसाठ, संपर्क प्रमुख भरत चव्हाण, माजी सचिव हिलाल नेरपगारे, नितिन शिरसाठ, निलेश महाले, बबलू पवार, हिरामण शिरसाठ, राजेंद्र शिरसाठ, शुभम शिरसाठ, कुंवर साहेब आदि उपस्थित होते. यावेळी कु. सीमा शिरसाठ हीचे अभिनंदन करत या यशाबद्दल भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Post a Comment