जागृत जनमंच पाचोरा व भडगाव शाखावतीने शेतकऱ्यांची कापुस खरेदी करताना होणारी लुट थांबवावी यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन
भडगावः- जळगाव जिल्हा जागृत जनमंच पाचोरा, भडगाव शाखावतीने शेतकऱ्यांची कापुस खरेदी करताना होणारी लुट थांबवावी यासाठी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकरी कापूस पिकवतो. या भागात अनधिकृत व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करतात. हे व्यापारी शेतकरीला कॉटन मार्केट पेक्षा जास्त दर देण्याचे प्रलोभन दाखवतात. शेतकरी कापूस मोजून देतो, माल विकून फरार होतो.शेतकरी लुटला जातो, तक्रार करतो,आंदोलन करतो. पण प्रशासन दखल घेत नाही. या लुटमारीत प्रशासन सहभागी असावे, असा समज शेतकऱ्यांमधे झालेला आहे. त्यामुळे शेतकरी व सरकार मधील विश्वास संपलेला आहे. कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लुटमार होऊ नये यासाठी अपील करीत आहोत. कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्याने व्यवसायाचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, त्याचा पुर्ण पत्ता, बॅंक खाते, आधारकार्ड याची माहिती संबंधित पोलिस स्टेशनमध्ये असणे आवश्यक आहे, त्यांचेकडे प्रमाणित वजनकाटा असणे आवश्यक आहे, कापसाची खरेदी रोखीने केली पाहिजे, खरेदी केलेल्या मालाची सही शिक्का असलेली पावती देणे बंधनकारक आहे, वजनकाटा व माप नियमन कायद्याचे पालन करावे, गावातील कापूस खरेदी पुर्व पोलिस पाटील किंवा तलाठी किंवा ग्रामसेवक किंवा कृषी अधिकारी यांना व्यापारीने लेखी माहिती द्यावी.
शेतकऱ्यांची लुट होऊ नये, याच हेतूने आपणास अपील करीत आहोत. कापूस खरेदी करतांना वजनात हेराफेरी, बोगस पावती देणे, माल घेऊन फरार होणे यातून उद्भवणारे हिंसक प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रांतधिकारी यांनी प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे जिल्हाध्यक्ष शिवराम पाटील, खलील देशमुख, रणजित पाटील, राकेश वाघ, भडगाव तालुकाध्यक्ष अभिमान हटकर, उपाध्यक्ष सुभाष ठाकरे, सचिव राजु पाटील, नवल सोनवणे, शांताराम आचारी, कायदेशिर सल्लागार अॕड भरत ठाकरे, बाबाजी पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment