ad headr

Powered by Blogger.

भडगाव तहसील कार्यालय आवारात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ' या कार्यक्रमाचे आयोजन..

दि.१२/०८/२०२२
भडगाव -भडगाव येथील तहसील कार्यालय आवारात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन महसूल विभाग भडगाव तहसील कार्यालया अंतर्गत येथील आवारात "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या कार्यक्रमांतर्गत हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत असून या कार्यक्रमाअंतर्गत भडगाव तालुक्यात या कार्यक्रमाअंतर्गत आपला राष्ट्रध्वज असलेला तिरंगा कशा पद्धतीने लावावा व तो कशा पद्धतीने उतरावा व आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याविषयी या कार्यक्रमाद्वारे राष्ट्रीय महापुरुष फुले, डॉ.आंबेडकर बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव बुद्रुक ता.भडगावचे कलावंत शाहीर परशुराम रूझू सूर्यवंशी, वादक भाऊसाहेब सूर्यवंशी,सहकलाकार संजय महाजन, रवींद्र बागुल, तुषार थोरात, अभिजीत सूर्यवंशी, यांच्या कलापथक शायरी पोवाडे, लोकगीते, पथनाट्याचा माध्यमातून राष्ट्रध्वज तिरंगा याविषयी राष्ट्रध्वजाचे पावित्र्य कसे राखावे व कसा फडकवावा याविषयी प्रबोधन केले. हर घर तिरंगा अमृत महोत्सव या विषयाचे महत्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला पटवून दिले. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे, कोळी भाऊसाहेब, पुरवठा अधिकारी गडरी रावसाहेब, यांच्यासह यावेळी मोठ्या प्रमाणात तहसील आवारात नागरिकांची उपस्थिती होती.

                      भडगाव प्रतिनिधी - सुभाष ठाकरे

No comments