प. स.माजी उपसभापती संभाजी भोसले यांच्या संकल्पनेतून फौजी बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण
आमडदे -ता. भडगाव येथे प. स.माजी उपसभापती संभाजी भोसले यांच्या संकल्पनेतून ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील जवान(फौजी) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांच्या संकल्पनेतून दर वर्षी आमडदे गावात महादेव मंदीराजवळ फौजी बांधवांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते. देश रक्षणासाठी फौजी बांधव सिमेवर तैनात असतात, कर्तव्य बजावत असतांना घर, दार, परिवार, मित्र,आप्तेष्ट सर्व काही विसरून देशाच्या सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावत. अशा सैनिकांच्या हस्ते संभाजी भोसले मित्र परिवार दर वर्षी आमडदे गावात ध्वजारोहण करतात. ह्या वर्षी-प्रमोद फौजी,सुरेश फौजी व सागर फौजी या जवानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वजारोहण करण्यात आले.संभाजी भोसले यांच्या या समाधान कारक उपक्रमाचे सर्वदूर कौतुक होत आहे. या ध्वजारोहण कार्यक्रमात सर्व गावकरी आनंदाने उत्साहात सहभागी झाले होते.

Post a Comment