ad headr

Powered by Blogger.

🔴 विरोधकांचा सत्तेविना तीडपापड..🔴 सत्ताधाऱ्यांची केविलवाणी धडपड..🔴साने गुरुजींची कर्मभूमी, संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, 🔴अमळनेर नगरी ची संपूर्ण घडी विस्कटन्याला जबाबदार तुम्ही🔴 नागरिकांच्या मौलिक अधिकारांचे हनन.🔴लोकप्रतिनिधींनी करावे आत्मचिंतन.


 अमळनेर दि. 23 ( प्रतिनिधी)   अमळनेर नगरीच्या विकासाला अडथळा निर्माण झाला असून. नवनियुक्त नगराध्यक्ष आणि त्यांचे सत्ताधारी टीम. यांना सत्ता चालवण्याचे गणित माहीत नसल्यामुळे. अमळनेर नगरीचा विकास खुंटला. विरोधकांच्या हातातून सत्ता निसटल्यामुळे सत्तेशिवाय यांचा तिळपापड दृष्टीस पडतो आहे. सर्वसाधारण सभेपासून तर कोणत्याही विकास कामाला खोडा घालण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. दोन्हीकडच्या निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी वारे माप उधळण करून सुद्धा सत्तेची खुर्ची हातात मिळाली नसल्यामुळे अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन झाली आहे.
 काही नवनियुक्त सदस्य तर अजूनही विजयाच्या आश्वावर आरुड होऊन नको ते बेकायदेशीर निर्णय घेऊन स्वतःचे हसू करून घेत आहेत. अनेक वर्ष अपयश अचवलेल्या उत्साही कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे त्यांना आकाश ठेंगणे वाटते आहे. तर मागच्या दाराने येणाऱ्या काही लोकप्रतिनिधींना असे वाटते आहे. तेच या नगरीचे खरे चाणक्य आहेत.
 अजित दादा सेनेच्या निगेटिव्ह मतामुळे नागरिकांना दुसरा पर्याय नसल्यामुळे शिंदे सेनेला सत्तेची चावी हातात मिळाली आहे. त्यात माजी आमदार यांना अविश्वसनीय यशाची आयती संधी मिळाली आहे. राजकीय पार्श्वभूमी नसताना कोणी राजकीय गॉडफादर नसताना सुद्धा फक्त आणि फक्त आरक्षणामुळे नगराध्यक्ष यांना प्रथम नागरिकाचा मान मिळाला आहे. त्यांच्या जातीच्या दाखल्यावर हरकत घेतल्यामुळे व कोर्टात दावा दाखल झाल्यामुळे ते हवालदिल झालेले दिसतात. त्या अनुषंगाने विकास कामे जैसे थे पडलेली आहेत ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले त्यांचा तर पूर्ण भ्रमनिरास झाला आहे. आजी-माजी आमदारांच्या अस्तित्व सिद्धीसाठी अमळनेर शहर वेठीस धरले जात आहे. शहराचा पाणीपुरवठा, बांधकाम खाते, आणि शिक्षण खाते, आरोग्य खाते यांची घडी आज पावेतो बसली नाही. मुंबई शहरातील गल्ली बोळाचा प्रत्येक रस्ता तुटलेल्या अवस्थेत आहे. त्या रस्त्यांमुळे प्रभावित नागरिकांना अच्छे दिन येतात की नाही याची शाश्वती नाही. आठशे कोटीचा वर बजेटची तरतूद आणि कृती आराखडा मंजूर केलेले नगरपालिका प्रशासन कोणत्या विकासकाची वाट पाहते आहे हा सर्वात मोठा प्रश्न अंमळनेरच्या बुद्धिजीवी लोकांना पडला आहे.

No comments