फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम. जैन ड्रिम स्पेसेसच्या भव्य क्रीडांगणावर आज होणार उद्घाटन सोहळा...
त्यांच्यासमवेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, खजिनदार राजेंद्र लढ्ढा, सचिव अरविंद देशपांडे, जेसीएल व्यवस्थापनाचे सुयूश बुरकूल, अभंग जैन, अॅड. सुरज जहॉंगीर, हितेश पटेल, समीर गुळवे, प्रशांत विरकर, रवींद्र धर्माधिकारी, जगदीश चावला, वरुण देशपांडे, उदय सोनवणे, बीसीसीआयचे पंच विनित कुलकर्णी, संदीप चव्हाण, संदीप गांर्गुेडे, मंगेश नार्वेकर, वैभव हलदे, संतोष बडगुजर, संदीप जरे व मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.
त्यांच्यासोबत सर्व संघ मालक, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित असतील.
सहा टीम, सहा प्रशिक्षक १०८ खेळाडू
जळगाव कोगटा किंग संघ मालक प्रेम कोगटा, अतुल कोगटा, प्रणव कोगटा, आयकॉन खेळाडू जगदीश झोपे, प्रशिक्षक घनश्याम चौधरी, जामनेर सातपूडा हिरोज् संघ मालक किरण बच्छाव, आयकॉन खेळाडू शतायू कुलकर्णी, प्रशिक्षक मुस्ताक अली, पाचोरा एसकेटी योद्धाज संघ मालक हेमंत कोठारी, प्रणव कोठारी, आयकॉन खेळाडू सचिन चौधरी, प्रशिक्षक पंकज महाजन, चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंर्ज्स संघ मालक सागर पार्क क्रिकेट क्लब, आयकॉन खेळाडू ओम मुंडे, प्रशिक्षक सचिन सोनवणे, रावेर रॉयल्स संघ मालक सीए महावीर जैन, विमल जैन, अखिल बनवट आयकॉन खेळाडू धवल हेमनानी, प्रशिक्षक तन्वीर अहमद, अमळनेर सुहांस जायंटस संघ मालक संदीप काबरा, श्रेयांस काबरा, आयकॉन खेळाडू शुभम शर्मा, प्रशिक्षक राहूल निंभोरे अशा सहा टीम व १०८ खेळांडूंमध्ये जळगाव क्रिकेट लिगचा महाकुंभ रंगणार आहे. आयपीएलच्या धर्तीवरील सर्व नियमावलीने होणाऱ्या या स्पर्धेचे गुणलेखन म्हणून मोहम्मद फजल, साद शेख, तौकिर रजा, मनिष चौबे हे काम करतील.
जैन ड्रीम स्पेसेस चे मैदान विजयांच्या स्वप्नांसाठी सजले..
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजीत व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६, JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगेल. लीग मॅचेच मध्ये प्रत्येक टीम पाच सामने एकमेकांशी खेळेल. त्यानंतर क्लालिफायर व एलिमेंटर सामने झाल्यानंतर ग्रॅण्ड फायनल होईल. एकूण १९ सामन्यांमधून चौकार, षटकारांसह गुगली, यॉर्कर, बॉउन्सरची धमाल बघायला मिळणार आहे. कांताई नगर जैन ड्रीम स्पेसेस येथील क्रीडांगणावरील ट्रप्फ विकेट सज्ज झाली आहे. हिरवळीच्या सुसज्ज लॉनसह मैदानाच्या बाऊंडरी ह्या एलईटी स्क्रीन ने लावण्यात आल्या आहेत. दिवस रात्रीच्या सामन्यांसाठी विशेष एलईडी लाईटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पुणे सारख्या मेट्रो सिटीमधील स्टेडियमचा लुक जैन ड्रीम स्पेसेस च्या क्रीडांगणावर अनुभवता येईल, यासाठी प्रेक्षकांसाठी विशेष गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. ती सर्वांसाठी खुली असेल.
असे रंगतील सामने..
दि. १८ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला जामनेर सातपुडा हिरोज विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.
दि. १८ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला चाळिसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स विरूद्ध जळगाव कोगटा किंग.
दि. १९ एप्रिल दुपारी ३ वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध जळगाव कोगटा किंग.
दि. १९ एप्रिल सायंकाळी जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध रावेर रॉयर्ल्स.
दि. २० एप्रिल सकाळी ८.३० वाजेला चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स विरूद्ध जामनेर सातपुडा हिरोज.
दि. २० एप्रिल दुपारी ३ वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.
दि. २० एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध रावेर रॉयल्स.
दि. २१ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला जळगाव कोगटा किंग विरूद्ध रावेर रॉयल्स.
दि. २१ एप्रिल दुपारी ३ वाजेला जामनेर सातपुडा हिरोज विरूद्ध अमळनेर सुहांस जायंट्स.
दि. २१ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.
दि. २२ एप्रिल सकाळी ८.३० वाजेला रावेर रॉयल्स विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज.
दि. २२ एप्रिल दुपारी ३ वाजेला अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.
दि. २२ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला जळगाव कोगटा किंग विरुद्ध जामनेर सातपुडा हिरोज.
दि. २३ एप्रिल दुपारी ३ वाजेला रावेर रॉयल्स विरुद्ध चाळिसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.
दि. २३ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध अमळनेर सुहांस जायंट्स.
दि. २४ एप्रिल दुपारी ३ क्लालिफायर-१
दि. २४ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला एलिमेंटर
दि. २५ एप्रिल सायंकाळी ७.३० वाजेला क्लालिफायर-२
दि. २६ एप्रिल सायंकाळी ७.३० ग्रॅण्ड फायनल
Post a Comment