ad headr

Powered by Blogger.

सर्वसमावेशक भारतासाठी अल्पसंख्याक विकास महत्वाचे -प्रा.विजय साळुंखे यांचे प्रतिपादन

अमळनेर-दि. 18 [ प्रतिनिधी ].येथिल खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सेंटर याठिकाणी अल्पसंख्याक दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते तर उपप्राचार्य डॉ.अशोक पाटील,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ.हेमंत पवार उपस्थित होते.
प्रमुख वक्ते प्रा.विजय साळुंखे यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात म्हटले की, अल्पसंख्याक समाज व नेतृत्वाचे योगदान हे प्राचीन काळापासून आढळून येते.
 यात जैन,बोद्ध,पारशी,शीख,मुस्लिम यांचे साहित्य,नेतृत्व व दायित्व राष्ट्रास दिशा देणारे होते.अल्पसंख्याक समाजाची भाषिक व धार्मिक आधारावर विभागणी आढळतेअल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भारत सरकारच्या विविध योजना निदर्शनास येतात.यामागचे एक महत्वाचे कारण म्हणजे भेदभाव निर्मूलन आपले नैतिक दायित्व आहे,त्यांच्या विकासासाठी भारतीय राज्यघटनेत अनुच्छेद २५ ते २८ मध्ये तरतूद करण्यात आली आहे 
म्हणून सर्वसमावेशक भारतासाठी अल्पसंख्याक विकास महत्वाचे आहे. एकूणच,अल्पसंख्याक समुदायास सामाजिक सुरक्षितता व समान संधी द्वारे त्यांचा विकास साधता येते,यासाठी संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, अशी वैचारिक भूमिका प्रा.साळुंखे यांनी मांडले.
   आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले की, सीसीएमसी विभागाचे मूळ नाव अल्पसंख्याकशी संबंधित होते,दादाभाई नवरोजी,मौलाना आझाद,मनमोहनसिंग यांचे योगदान महत्त्वाचे आहे.आपला देश हा विविध विचारांनी व्यापलेला आहे,भारतात महिला व पुरुष या दोनच जाती अस्तित्वात आहेत, असे प्रतिपादन केले.
प्रस्तुत समारंभास करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ.विजय तुंटे, उपप्राचार्य डॉ.व्ही.बी.मांटे, डॉ.जितेंद्र पाटील,डॉ.विवेक बडगुजर, प्रा.रामदास सुरळकर,डॉ.प्रियंका पाटील,प्रा.अमोल अहिरे,प्रा.सोनूसिंग पाटील,प्रा.सचिन आवटे,डॉ.आकाश गव्हाणे,प्रा.भिका पावरा यांच्यासह सीसीएमसी विभागाचे पराग रवींद्र पाटील, नंदूसिंग पाटील,अतुल धनगर,विशाल अहिरे,योगेश चिंचोरे,दितेश चिंचोरे,धिरज चौधरी,प्रिया बोरसे,आफ्रिन पठाण,पाटील निकिता,पाटील भावना,पाटील श्वेता, चैताली चौधरी,रिद्धी राठोड,तेजस्विनी पाटील,अक्षय सोनवणे लक्ष्मी पाटील,मोहित पाटील,मयुरी पाटील,प्रिया बोरसे,गायत्री पाटील,रोशनी बाविस्कर, दिपाली पाटील,नंदिनी पाटील आदी उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.हेमंत पवार यांनी केले तर डॉ.प्रमोद चौधरी यांनी आभार मानले.

No comments