कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे सभापती अशोक आधार पाटील जळगाव जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देणार... सूत्रांकडून माहिती अशोक पाटील मार्केट सभापती यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा होणार.
अमळनेर दि. 4/11.[ प्रतिनिधी ].अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले आणि अचानकच कृषी उत्पन्न बाजार समिती या सर्वात मोठ्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून नावारूपास आलेले, शेतकऱ्या प्रति सहृदयी असणारे अशोक आधार पाटील यांचा नावलौकिक राजकारणाच्या पटलावर प्रस्थापितांना धक्का देणारा जाणऊ लागला. त्यांचा दिनांक पाच नोव्हेंबर रोजी वाढदिवस आहे त्यांना सर्वप्रथम" मानव हित न्यूज"परिवार व " खानदेश जनमत," बातमी पत्र परिवार यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक , मंगलमय शुभेच्छा.
मागच्या वर्षी पोळा सणानिमित्त तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बैल जोडीना बैलांचा साज देणारे महाराष्ट्रातील एकमेव पुढारी ,शेतकरी नेता माननीय अशोक आधार पाटील हे ठरले आहेत. या वाढदिवसाला काहीही बळेजाव न करता स्वतःचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने करून यावर्षी "पूरग्रस्त "बाधित शेतकऱ्यांना ,नागरिकांना मदत आणि अर्थसाह्य देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
असा संकल्प करणारे सभापती यांना पुन्हा एकदा जन्मदिनाच्या शुभेच्छा.
Post a Comment